

BJP Hides 43 Corporators In Virar Amid Defection Tension
Esakal
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी विरोधकांना भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची भीती आहे. पण याच्या उलट चित्र वसई विरारमध्ये बघायला मिळत आहे. भाजपचेच तब्बल ४३ नगरसेवक अज्ञातवासात गेले आहेत. ऑपरेशन शिट्टीच्या धाकामुळे भाजपनं त्यांच्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी पाठवल्याचं म्हटलं जातंय.