निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने महाराष्ट्राला बदनाम करणे थांबवावे : नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने महाराष्ट्राला बदनाम करणे थांबवावे : नाना पटोले

डोंबिवली : इतर राज्यात निवडणुका आल्या की भाजपा महाराष्ट्राला प्रचाराच साधन बनवून बदनाम करते. बिहार निवडणुकीच्यावेळी सुशांतसिंग प्रकरण आणि उत्तर प्रदेश निवडणुकी दरम्यान ड्रग्सचा मुद्दा उपस्थित केला गेला. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्राची बदनामी करण्याचे काम सुरू आहे हे वानखेडे प्रकरणात दिसुन येते. केंद्र सरकारने महाराष्ट्राची बदनामी करणे थांबवावे. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम केले तर येथील जनता ते खपवून घेणार नाही असा इशारा काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी कल्याण मध्ये केंद्र सरकारला म्हणजेच भाजपाला दिला.

महाराष्ट्र प्रदेश कल्याण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी कल्याण मध्ये जनजागरण यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारला वरील इशारा दिला. भाजप सरकारच्या काळात जनतेची लूट सुरू असून ही जनजागरण मोहीम महाराष्ट्रात नव्हे तर देशात राबवून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणन्याचा काँग्रेसचा संकल्प असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. या यात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा: जळगाव : वैज्ञानिक होण्यासाठी मोठ्या शिक्षणाची गरज नाही

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी पुढील वक्तव्य केली.

कोरोनाच्या महामारी नंतर आर्थिक कमजोरी देशात आली आहे. त्यांनतर सुध्दा भाजपने जीवनश्यावक वस्तूच्या किमती वाढवून जनतेचे किस्से कापण्याचे काम सुरू केले आहे.६० रुपये पेट्रोल व डिझेल वर केंद्र सरकार शेषच्या रुपात जनतेची लूट करत आहे.ज्याठिकाणी कॉंग्रेसचे सरकार आहे, त्याठिकाणी व्हॅटचे दर कमी करून राज्यातील जनतेला मदत करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारला देखील कॉंग्रेसच्या वतीने व्हॅट कमी करून राज्याच्या जनतेला दिलासा दयावा अशी विनंती करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

शरद पवारांकडून अनिल देशमुखांना समर्थन दिले जात असल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे यावर पटोले म्हणाले, काँग्रेसची भूमीका आम्ही वारंवार स्पष्ट केली आहे. कोणाच्याही व्यक्तिगत प्रश्नामध्ये काँग्रेस कधीही हस्तक्षेप करणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांच्या व्यक्तव्यामध्ये आम्हाला काहीही स्वारस्य नाही.

हेही वाचा: "आम्हाला शिवराय खऱ्या अर्थाने बाबासाहेबांमुळेच समजले"

विधान परिषदेच्या जागा निश्चीत झाल्यावर पंकजा मुंडे यांची खदखद समोर आली यावर ते म्हणाले, भाजपमध्ये मोठया प्रमाणात खदखद सुरु आहे, हे तर स्पष्ट आहे. त्याचे परिमाण काय होणार हे पुढच्या काळात समजेल.

सदाभाऊ खोत यांनी अनिल परब यांना सैतान मंत्री असे संबोधले आहे. याविषयी ते म्हणाले, ते पण मंत्री होते.आपण कोणावर या पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपणही पहिले आपल्याला समजून घेतले पाहीजे. ही काही महाराष्ट्राची परंपरा नाही. गुजरातची परंपरा सदाभाऊनीं आणली असेल तर मला माहिती नाही.

loading image
go to top