esakal | मुंबईकरांनो सावधान! जुलै महिन्यातील आठ दिवस धोक्याचे; प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा..
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai beach

एकीकडे मुंबईत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता आणि आता तीन महिने उलटून गेले तरी कोरोनाचे संकट काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे.

मुंबईकरांनो सावधान! जुलै महिन्यातील आठ दिवस धोक्याचे; प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : एकीकडे मुंबईत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता आणि आता तीन महिने उलटून गेले तरी कोरोनाचे संकट काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. दररोजच्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबई शहरात पुन्हा एकदा कलम 144 लागू करण्यात आले आहे. कोरोनाचे हे संकट कायम असताना जुलै महिन्यात मुंबईकरांना आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार. त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट अन् 'त्या' व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिस धावून गेले

जून महिन्यात कोरोनाचे संकट असताना महाराष्ट्रावर निसर्ग चक्रीवादळाचे संकट आले होते. मुंबईसह कोकणात निसर्ग चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला होता. त्यापाठोपाठ आता जुलै महिन्याचे आठ दिवस उधाणाचे असून समुद्राला मोठी भरती येणार आहे. साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरतीच्या वेळेत जुलैमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांनी सतर्क रहावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भरती आणि जोरदार पाऊस या पार्श्वभूमीवर पालिकेनेही आपली आपत्कालीन यंत्रणा सक्षम केली असून चौपाट्यांसह, दहा केंद्रांवर आवश्यक साधनसामग्रीसह जवान तैनात ठेवले आहेत.          

ठाणेकरांनो! उद्यापासून असा असेल 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून 'नियमावली' जाहीर

समुद्राला भरती असताना मुंबईत अतिवृष्टी झाल्यास समुद्रात जाणारे पाणी थांबल्याने तुंबण्याची शक्यता आहे. यावेळी उधाण आणि साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्यास आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नरिमन पॉइंट, गवालिया टँक, दादर, वांद्रे, कुर्ला, बीकेसी, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली या केंद्रांवर आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवली आहे. यामध्ये 132 प्रशिक्षित जवान रेस्क्यू ऑपरेशनसाठी आवश्यक असणारी साधनसामग्री घेऊन  तैनात आहेत. तर गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा चौपाट्यांवर आवश्यकतेनुसार 94 लाइफ गार्ड तैनात ठेवण्यात आले आहेत. मुंबईकरांनी भरती असताना सावध रहावे, चौपाट्यांवर जाऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे.

असा आहे 'तुर्भे पॅटर्न', गेल्या 10 दिवसात एकही रुग्ण नाही

या दिवशी येणार मोठी भरती 

 • शनिवार 4 जुलै (सकाळी 11.38) - पाण्याची उंची 4.57 मीटर
 • रविवार 5 जुलै (दुपारी 12.23) - लाटांची उंची 4.63 मीटर.
 • सोमवार 6 जुलै (दुपारी 1.06) - लाटांची उंची 4.62 मीटर
 • मंगळवार 7 जुलै (दुपारी 1.46) - लाटांची उंची 4.54 मीटर
 • मंगळवार 21 जुलै (दुपारी 12.43) - लाटांची उंची 4.54 मीटर
 • बुधवार 22 जुलै (दुपारी 1.22) - लाटांची उंची 4.63 मीटर
 • गुरुवार 23 जुलै (दुपारी 2.03) - लाटांची उंची 4.66 मीटर
 • शुक्रवार 24 जुलै (दुपारी 2.45) - लाटांची उंची 4.61 मीटर

कोरोनावरील उपचारासाठी तब्बल १३ लाखांचे बिल; मनसेकडे धाव घेताच...!


ऑगस्टमध्येही चार दिवस उधाणाचे -

 • बुधवार 19 ऑगस्ट (दुपारी 12.17) - लाटांची उंची 4.61 मीटर
 • गुरुवार 20 ऑगस्ट (दुपारी 12.55) -लाटांची उंची 4.73 मीटर
 • शुक्रवार 21 ऑगस्ट (दुपारी 1.33) -लाटांची उंची 4.75 मीटर
 • शनिवार 22 ऑगस्ट (दुपारी 2.14)- लाटांची उंची 4.67 मीटर
loading image