Mumbai Air Quality Monitoring to Be Managed by Private Company
esakal
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या हवेच्या गुणवत्तेवर अधिक अचूक आणि सातत्यपूर्ण देखरेख ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सांताक्रूझ येथील वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेतील (एअर क्वालिटी लॅब) वैज्ञानिक आणि तांत्रिक कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मे. महाबळ एन्व्हायरो इंजिनिअर्स प्रा. लि. या संस्थेची निवड करण्यात आली असून, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवण्यात आला आहे.