

Bhagwati Hospital Project
ESakal
मुंबई : उत्तर मुंबईत आरोग्यसेवेत एक क्रांतिकारी सुधारणा होणार आहे. बोरिवली येथील बीएमसीच्या भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाचा आता अंतिम टप्प्यात प्रवेश झाला आहे. उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या सक्रिय हस्तक्षेपानंतर सुमारे ₹५०० कोटी खर्चाचा हा दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्प वेगाने पुढे जात आहे.