esakal | मुंबईकरांसाठी गुड न्यूज! महापालिकेकडून दहा टक्के पाणीकपात रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! महापालिकेकडून दहा टक्के पाणीकपात रद्द

जून-जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 34 ते 35 टक्के पाणीसाठा होता.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! महापालिकेकडून दहा टक्के पाणीकपात रद्द

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : जून-जुलै महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने मुंबईकरांवर 20 टक्के पाणीकपातीचे संकट ओढवले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली. मोडकसागर, तानसा, भातसा धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणीकपात 20 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आली. त्यानंतर धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील एकूण पाणीसाठा 95.19 टक्क्यांवर गेलाय. हा पाणीसाठा पुढील वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी पुरेसा असल्याने मुंबईवरील 10 टक्के पाणीकपात उद्यापासून (ता.29) रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय.

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी, नक्की वाचा

जून-जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 34 ते 35 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे 5 ऑगस्टपासून मुंबई शहरात महापालिकेकडून 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. त्यानंतर धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे ही पाणीकपात 21 ऑगस्टपासून 10 टक्के करण्यात आली. त्यानंतर आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण 95.13 टक्के पाणीसाठा झालाय. हा पाणीसाठा पुढील वर्षभर मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पुरेसा असल्याने शनिवारपासून (ता.29) मुंबईतील पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. त्यामुळे आता मुंबईकरांना नियमीतपणे 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होणार आहे. त्याशिवाय भिवंडी आणि ठाणे महापालिकेला केला जाणारा रोजचा 150 दशलक्ष पाणीपुरवठाही नियमीत सुरु करण्यात येणार आहे.

पुढील वर्षी बाप्पा येऊ शकणार नाही म्हणून इतिहासजमा होणाऱ्या वास्तूला कलाकुसरीने मांडण्याचा प्रयत्न

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये शुक्रवार (ता.28) सकाळपर्यंत 13 लाख 77 हजार 690 दशलक्ष लिटर पाणीसाठा असून एकूण क्षमतेच्या तो 95.19 टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला वर्षभर नियमीत पाणीपुरवठा होण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज असते.

मुंबईकर प्रचंड टेन्शनमध्ये, सर्व्हेतून मुंबईकरांबाबत धक्कादायक बाब झाली उघड

तलावांमधील पाणीसाठा (दशलक्ष लिटर )

तलाव शुक्रवारचा पाणीसाठा आवश्‍यक पाणीसाठा
अप्पर वैतरणा 202796 227047
मोडकसागर 128910 128925
तानसा 144240 145080
मध्य वैतरणा 183806 193530
भातसा 682194 717037
विहार 27698 27698
तुळशी 8046 8046


---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image