

Mumbai Municipal Elections
ESakal
मुंबई : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील इतर २९ महानगरपालिकांसह मुंबई बीएमसी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेमुळे महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र यातच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पतंगाची भीती वाटू लागली आहे. या निवडणुकीत पतंग शिंदेसेनेचे गणित बिघडवणार आहे.