Mumbai: मुंबईच्या पाणीपुरवठ्याला बॅकअप! भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात ट्रान्सफॉर्मर उभारण्याचा निर्णय; १४ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च

Mumbai Water Supply: मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात ट्रान्सफॉर्मर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १४ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
BMC

BMC

Esakal

Updated on

मुंबई : विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे मुंबई शहराचा अनेकदा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. भविष्यात अशा तांत्रिक कारणांमुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने मुंबईचा तब्बल ८० टक्के पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण प्रकल्पात अतिरिक्त ११० के.व्ही. नवीन पॉवर रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पर्यायी व्यवस्थेमुळे मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे शक्य होणार आहे, यासाठी पालिका १४ कोटी ६७ लाख रुपये खर्च करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com