BMC News: पालिकेचा दणका, मालमत्ता कर न भरणाऱ्या सहा मोटर गॅरेजवर जप्ती

BMC News
BMC Newssakal

सातत्याने पाठपुरावा करुनही मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहा ऑटो गॅरेज मालमत्ताधारकांवर मुंबई महानगरपालिकेने आज जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. या सहाही मालमत्ताधारकांकडे एकूण ४५ लाख ३५ हजार ३५९ रुपयांची कर थकबाकी आहे.

पालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्याकडून सातत्याने केले जात आहे. करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

BMC News
Mumbai Local News: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

पालिकेच्या ‘एस’ विभागाच्या टीमने आज टागोरनगर विक्रोळी (पूर्व) परिसरातील सहा मोटार गॅरेज मालमत्ताधारकांवर मुंबई महानगरपालिका अधिनियम-१८८८ च्या कलम २०५ नुसार, जप्ती आणि अटकावणीची कारवाई केली.

या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याची अंतिम मुदत २५ मे आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

BMC News
Maharashtra News: राज्य सरकार २१ कोटींची खरेदी करणार सुतळी; जाणून घ्या कारण

जप्ती आणि अटकावणीची कारवाई झालेल्या मालमत्ता

-- हरदीपसिंग धालीवाल (०१ लाख ८६ हजार ७०९ रुपये)

-- अवतारसिंग गुरुमितसिंग (०२ लाख हजार २० रुपये)

-- अर्जुनसिंग गुरुमितसिंग (०६ लाख ४ हजार ८७७ रुपये)

--- सुखविंदर कौर धालीवाल (०१ लाख ०३ हजार ८४ रुपये )

-- दारासिंग धालीवाल (२७ लाख ८२ हजार ४९२ रुपये)

-- जगतारासिंग गुरुमितसिंग (०६ लाख ४ हजार ८७७ रुपये)

BMC News
Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com