BMC: दोन्ही शिवसेना शेजारी? ठाकरेंच्या कार्यालयातील ३० टक्के जागा काँग्रेसला

BMC Office Allocation Process: मुंबई महापालिका मुख्यालयात कार्यालये वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये पालिकेने ठाकरेंच्या कार्यालयातील ३० टक्के जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला आहे.
BMC Office Allocation Process

BMC Office Allocation Process

Esakal

Updated on

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयात विविध राजकीय पक्षांना कार्यालये वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. पालिका मुख्यालयातील काँग्रेसचे पूर्वीचे कार्यालय शिंदे गटाला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ठाकरे गटाच्या तळमजल्यावरील कार्यालयाशेजारीच कार्यालय द्यावे, अशी मागणी शिंदे गटाने केली; परंतु ठाकरेंच्या कार्यालयातील ३० टक्के जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला ठाकरेंच्या शेजारीच कार्यालय मिळते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com