

Sion Flyover Reopen
ESakal
मुंबई : सायन उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम बीएमसीने वेगाने सुरू केले आहे. ३१ मे २०२६ या निर्धारित मुदतीपूर्वी ते पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर आणि सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या संयुक्त आढावा बैठकीत प्रकल्पाची प्रगती, उर्वरित कामाचे टप्पे आणि त्यांच्या वेळापत्रकावर सविस्तर चर्चा करण्यात आली.