बीएमसीचा विचित्र कारभार! विद्यार्थ्यांना बसायला बाक नाहीत, पण अधिकाऱ्यांसाठी ७९ लाखांच्या लक्झरी खुर्च्या-टेबल

BMC School And Furniture Controversy News: बीएमसी शाळांच्या दयनीय अवस्थेच्या पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांसाठी ७९ लाख रुपयांच्या आलिशान फर्निचरच्या खरेदीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
BMC Furniture Controversy

BMC Furniture Controversy

ESakal

Updated on

मुंबई : बीएमसी (BMC) आपल्या शाळांमधील उप-शिक्षण अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी खुर्च्या व टेबल्स खरेदी करण्याची योजना आखत आहे. ४३० खुर्च्या आणि टेबल्ससाठी एकूण ७९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले होते; मात्र, या आकड्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मनसेचे गटनेते आणि स्थायी समितीचे सदस्य यशवंत किल्लेदार यांनी यावर आक्षेप नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com