म्हाडाची घरे विलगीकरणासाठी; हस्तांतराअभावी घरमालक अद्यापही घरांच्या प्रतिक्षेत

म्हाडाची घरे विलगीकरणासाठी; हस्तांतराअभावी घरमालक अद्यापही घरांच्या प्रतिक्षेत

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने काढलेल्या सोडतीमधील विजेत्यांनी घराबाबत सर्व रक्कम भरली आहे. त्यानुसार म्हाडाने विजेत्यांना ताबा पत्रही दिले आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने मुंबई महापालिकेने म्हाडाची घरे विलगीकरणासाठी कोणतीही परवानगी न घेता ताब्यात घेतली आहेत. यातील सुमारे 600 घरे विनावापर पडून असली तरी महापालिकेने ती म्हाडाकडे हस्तांतरित केलेली नाहीत. घराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरही घराचा ताबा मिळत नसल्याने विजेते त्रस्त झाले आहेत.

मुंबई मंडळाने शहर आणि उपनगरातील विविध विभागातील घरांची सोडत दोन वर्षांपूर्वी काढली. घरांचे स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात विजेत्यांनी घराची रक्कम टप्याटप्याने भरली. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावावेळी मुंबई महापालिकेने म्हाडा प्रशासनाला विश्वासात न घेता सोडतीमधील घरे ताब्यात घेतली. सुमारे 1 हजार घरे पालिकेने ताब्यात घेतली असून यामधील सुमारे 700 ते 800 विजेत्यांना ताबा पत्र देण्यात आले आहे. घराचा ताबा घेण्यासाठी विजेत्यांची बँकांकडून कर्ज घेतले आहे. या कर्जाचे हप्तेही सुरू झाले आहेत. मात्र ही घरे विलगीकरणासाठी अजूनही पालिकेच्या ताब्यात असल्याने विजेत्या अर्जदारास स्वत:च्या हक्काच्या घराचा ताबा आणखी लांबला आहे.

म्हाडाने करोनाच्या पार्श्वभूमीवर सायन प्रतीक्षा नगर,मानखूर्द मालाड-मालवणी,गोरेगांव उन्नत नगर,चेंबूर शेल कॉलनी  कांदिवली चारकोप मधील 800 घरांच्या   इमारती विलगीकरणासाठी पालिकेच्या ताब्यात दिल्या यातील फक्त प्रतीक्षा नगर येथील 200 घरे  विलगीकरणासाठी वापरात आली. इतर घरे अजूनही विनावापर पडून आहेत. महापालिका ही घरे कधी देणार याविषयी काही पत्रव्यवहार झालेला नसल्याने या घरांचा ताबा आणखी लांबणार असल्याची माहिती म्हाडातील एका अधिकाऱ्याने दिली.

सोडतीमधील विजेत्यांची घराची रक्कम भरली असून त्यानुसार म्हाडाने त्यांना ताबा पत्रही दिले आहे. त्यामुळे विजेते घर कधी मिळणार याबाबत म्हाडाकडे विचारणा करत आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com