

BMC
Esakal
मुंबई : दक्षिण मुंबईच्या सांस्कृतिक मक्तेदारीला पूर्णविराम मिळणार आहे. मुंबई महापालिकेने जोगेश्वरी (पूर्व) येथील पूनमनगरमधील 'शिल्पग्राम' प्रकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हे शिल्पग्राम केवळ उद्यान किंवा खुली जागा न राहता 'सेल्फ-सस्टेनेबल' (स्वयंपूर्ण) आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य सांस्कृतिक केंद्र म्हणून नावारूपाला येणार आहे. या प्रकल्पाचा 'मास्टर प्लॅन' महापालिकेच्या व्यवसाय विकास विभागाने तयार केला आहे.