Mumbai Crime: आधी पैसे कमवू नंतर लग्न करू, प्रेयसीची विनवणी, प्रियकर संतापला अन् रागात...; धक्कादायक कृत्यानं मुंबई हादरली
Mira road Crime: मुंबईत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. प्रेयसीसोबत सततचे भांडण आणि संशयावरून प्रियकराने टोकाचे पाऊल उचलले असून घटनेने मुंबई हादरली आहे.
भाईंदर: अन्य कोणाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एकाने प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १२) रात्री मिरा रोड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.