Corona : 'या' शहरात खरेदी करिता लोकांची गर्दी, काळजी न घेतल्यास धोका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

शासन तसेच प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या नागरिकांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना त्याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे नवी मुंबईत दिसून येत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार नवी मुंबईत धारावी परिसरासारखा कोरोना फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तुर्भे : शासन तसेच प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या नागरिकांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना त्याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे नवी मुंबईत दिसून येत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार नवी मुंबईत धारावी परिसरासारखा कोरोना फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून सोशल डिस्टेंसिंगचे नियम न पाळणाऱ्यांवर करवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

मोठी बातमी : यशस्वी लढा ! 'या' जिल्ह्यातील 18 जण कोरोनामुक्त

नवी मुंबई परिसरात विविध ठिकाणी भाजी, फळे तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी भाजी मंडई निर्माण करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना विशिष्ट अंतरावर उभे राहावे म्हणून तशी व्यवस्था केली आहे. परंतू तुर्भे बाजारपेठेत मात्र सोशल डिस्टें नियम तोडून नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत

महत्वाची बातमी : घाटकोपर ग्राउंड रिपोर्ट: गजबज सरली; दहशत उरली...

विक्रेत्यांसोबत मुलेही बाजारात
तुर्भे येथील दफनभूमी लगतच्या मैदानावर दुपारी भाजीपाला बाजार भरविण्यात येतो. याठिकाणी विक्रेता स्वतः आपल्या कुटुंबासाहित लहान मुलांना देखील आणत आहे. तसेच ग्राहकही जोडीला इतरांना आणत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. नेरुळ येथील सेक्टर 10 मध्ये गुडविल इमारती शेजारी भरलेला बाजार असो, वा कोपरखैरणे येथील डी मार्ट व रिलायन्स फ्रेश असो येथेही नागरिकांना गर्दी करत विशिष्ट अंतर पाळले नसल्याचेच दिसून आले.

हे ही वाचा : लॉकडाऊनचा कंटाळा आला म्हणून १५ कोटींच्या कंपनीचा मालक बनला डिलेव्हरी बॉय

तुर्भे परिसरात दररोज साहित्य खरेदीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यावर मनपा व पोलिस प्रशासनाने कारवाई केली तर गर्दी आटोक्यात येईल. अन्यथा कोरोना विषाणूचा येथे मोठ्या प्रमाणात फैलाव होईल.
-राजेंद्र इंगळे, परिवहन सदस्य, मनपा

 

broke role of social distance in Navi Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: broke role of social distance in Navi Mumbai