esakal | पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन धावणार ?भूसंपादनास बहुसंख्य शेतकऱ्यांची संमत्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन धावणार ?भूसंपादनास बहुसंख्य शेतकऱ्यांची संमत्ती

sakal_logo
By
- प्रकाश पाटील

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला पालघर जिल्ह्यात हळूहळू विरोध मावळत चालल्याचे दिसून येत आहे आतापर्यंत या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील साठ ग्रामपंचायतींनी जमीन देण्याची सहमती दर्शवली असल्‍याचे बुलेट ट्रेन चे भूसंपादन उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांनी हि माहिती दिली. असे असले तरी अजूनही या प्रकल्पाला ११ गावांचा विरोध असून तो विरोध त्यांचे गैरसमज बाजूला काढल्यावर मावळेल अशी आशाही पावले यांनी यावेळी व्यक्त केली.

पालघर जिल्ह्याच्या वसई,पालघर डहाणू व तलासरी तालुक्यातून बुलेट ट्रेन जात आहे यासाठी एकूण 71 गावांची जमीन संपादित होणार आहे यापैकी आतापर्यंत 57 गावांमध्ये खाजगी जमिनीची भूसंपादन प्रक्रिया पार पडली असून तीन गावांमध्ये शासकीय जमिनी असल्याने त्यांची ही भूसंपादन प्रक्रिया पार पडली आहे या प्रकल्पासाठी 187.11 हेक्टर जागा संपादित होणार आहे यापैकी थेट वाटाघाटीने आतापर्यंत 26. 33 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे अलीकडेच 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभांमध्ये अकरा ग्रामपंचायतींनी या प्रकल्पासाठी जमीन देण्याचे मंजूर ठराव दिलेले आहेत तर 11 गावांचा आजही या प्रकल्पाला विरोध आहे

हेही वाचा: भारताकडे ड्रोन हल्ल्याला उत्तर द्यायची टेक्नोलॉजी नाही - राहुल पंडित

यामध्ये तलासरी तालुक्यात एक,वसई तालुक्यातील एक, डहाणू तालुक्यातील दोन व पालघर तालुक्यातील सात गावांचा समावेश आहे या प्रकल्पासाठी भूसंपादन होणाऱ्या 71 ग्रामपंचायतींपैकी 43 गावे ही पेसा अंतर्गत म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील आहेत खाजगी जागा संपादित होणाऱ्या 57 ग्रामपंचायतीची प्राथमिक अधिसूचना भूसंपादन अधिकारी यांनी जाहीर केली आहे आता या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील बहुतांश जमिनी संपादित झाल्यामुळे बुलेट ट्रेन पकल्प पालघर जिल्ह्यातून धडधडून जाण्याची दाट शक्यता आहे

जिल्ह्यात आता 11 गावांचा विरोध असला तरी या गावांमध्ये असलेले प्रकल्पाबाबतचे गैरसमज दूर करून ही गावे भूसंपादन करण्यासाठी प्रयत्न केली जातील व नागरिकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दयावा असे आवाहन संदीप पवार यांनी केली आहे.

loading image
go to top