
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याविरोधात डोंबिवलीत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने रस्त्यावर उतरत श्रद्धांजली वहात पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत या हल्ल्याचा निषेध केला. यावेळी बैलांच्या अंगावर अतिरेकी हल्ल्यातील मन हेलावणारी चित्र रेखाटून, पाकिस्तानचा निषेध करणारे संदेश लिहित या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. ठाणे रायगड, पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील शेकडो बैलगाडा चालक मालक डोंबिवलीतील हेदुटणे गावाजवळ एकत्र आले होते. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला असून दहशतवाद्यांना पकडून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.