क्रिकेटची मॅच बघत चालवत होता बस, ई-शिवनेरीच्या चालकाला केलं बडतर्फ; कंपनीलाही दंड, मंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बससेवा आहे. या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करत असतात. अपघातविरहित सेवा असा बससेवेचा लौकिक असल्याचं मंत्री सरनाईक यांनी म्हटलंय.
क्रिकेटची मॅच बघत एसटी बस चालवणाऱ्या चालकावर एसटी महामंडळाकडून बडतर्फीची कारवाई करण्यात आलीय. तसंच कंपनीला खासगी कंपनीला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाने ही कारवाई केली.