आशिष शेलारांची बदनामी केल्याप्रकरणी 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे प्रदेश सचिव हैदर आझम यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Ashish Shelar
Ashish ShelarSakal
Summary

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे प्रदेश सचिव हैदर आझम यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई - मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे प्रदेश सचिव हैदर आझम यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते आझम यांचा भाऊ जावेद मोहम्मद फारुख आझम यांनी गोरेगाव येथील बांगूर नगर पोली ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जावेद मोहम्मद फारुख आझम यांनी अनिल कोकीळ, नीलेश पारडे, विजय तेंडुलकर आणि आकाश बागुल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण आदित्य ठाकरे यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात आहे. या सर्वांविरुद्ध भादंवि कलम 153 (ए), 426, 500, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेंग्विन सेनेकडून माझी बदनामी

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले की, पेंग्विन सेना कुठले जुनेपुराणे संदर्भहिन फोटो शोधून समाज माध्यमात जी माझी बदनामी करीत आहे, त्या विरोधात हैदर आझम यांनी गुन्हा दाखल केला आहे. गेली 25 वर्षे मुंबईला ज्यांनी लुटले त्यांचे गोरखधंदे उघड होऊ लागल्याने सैराटलेत. होऊद्या, खोट्या पत्त्यांचे इमले चढवत रहा.. ढासळणार आहेतच!

हिंदू-मुस्लिम समाजात तेढ

भाजपचे प्रदेश सचिव हैदर आझम यांनी सांगितले की, ज्या लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण युवासेनेचे आहेत. या आरोपीना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. आशीष शेलारांना खजूर खाऊ घालत असल्याचे व्हायरल फोटो फोटोमध्ये दिसत आहे असे फोटो चुकीच्या पद्धतीने शेअर करून हिदू मुस्लिम समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com