esakal | रिया-सुशांतच्या भेटीचा दावा ठरला खोटा; सीबीआयने शेजारणीला सुनावले
sakal

बोलून बातमी शोधा

sushant_singh_rajput_rhea_chakraborty

रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी माध्यमांपुढे खोटे दावे करणार्‍या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी सीबीआयकडे केली आहे. टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर खोटे दावे करणाऱ्या लोकांची यादी सीबीआयला पाठविणार आहोत, असे मानशिंदे यांनी म्हटले आहे.

रिया-सुशांतच्या भेटीचा दावा ठरला खोटा; सीबीआयने शेजारणीला सुनावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी रिया चक्रवर्तीला भेटल्याचा दावा खोटा ठरला आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय) रियाच्या शेजार्‍यांची विचारपूस केली असता सत्य उघडकीस आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. असे खोटे दावे करणार्‍या लोकांना सीबीआयने कडक इशारा दिला आहे.

मोठी बातमी : अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, बॅकलॉगचे वेळापत्रक बदलले!​

रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी माध्यमांपुढे खोटे दावे करणार्‍या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी सीबीआयकडे केली आहे. टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर खोटे दावे करणाऱ्या लोकांची यादी सीबीआयला पाठविणार आहोत, असे मानशिंदे यांनी म्हटले आहे. ड्रग्स प्रकरणी एक महिन्याने तुरुंगातून बाहेर आलेल्या रियाने तिच्याबद्दल मीडियात सुरू असलेला दुष्प्रचार आणि तिच्यावरील खोट्या दाव्यांबाबत कोर्टात जाण्याचे आधीच ठरवले आहे. सुशांतसिंग राजपूत १४ जूनला वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. त्यानंतर फॉरेन्सिक अहवालाची तपासणी करणाऱ्या दिल्लीतील एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब केले.

MPSCची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर तज्ज्ञ, विद्यार्थी म्हणतात, असं वागणं बरं नव्हं!​

टीव्ही चॅनेलसमोर केला होता दावा
शांत आणि रिया चक्रवर्ती हे १३ जूनला एकमेकांशी भेटले होते, असा दावा रियाच्या शेजारणीने एका टीव्ही चॅनेलशी बोलताना केला होता. तपासासंदर्भात जेव्हा सीबीआय रियाच्या घरी गेली तेव्हा त्या शेजारणीला तिने केलेल्या दाव्याबाबत काही ठोस सांगता आले नाही. १३ जूनला सुशांतने रियाला तिच्या घरी ड्रॉप केल्याचे मी पाहिले नाही, अशी माहिती संबंधित महिलेने सीबीआयला दिली आहे.

आंतरराष्ट्रीय बालिका दिन : आजही सावित्रीच्या लेकींची उच्च शिक्षणात होतेय परवड​

खोट्या आणि निराधार बातम्यांमुळे कुटुंबाला त्रास
इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियामध्ये रिया आणि तिच्या कुटुंबियांविरूद्ध खोट्या आणि निराधार बातम्या प्रसिद्ध झाल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. खोट्या आरोपांमुळे या प्रकरणात आणखी गोंधळ वाढला. आणि यामुळेच तीन केंद्रीय एजन्सींना तपासात सामील व्हावे लागले. यानंतर रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांनाही अटक करण्यात आली, असे रियाच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. मुंबई हायकोर्टने गेल्या आठवड्यात रियाला जामीन मंजूर केला होता, मात्र, शौविक अजूनही तुरूंगातून बाहेर येऊ शकलेला नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)