.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Vande Bharat Railway
नितीन बिनेकर
मुंबई : देशभरात ‘वंदे भारत’ गाड्यांचा वेगाने विस्तार होत असताना त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची वाढती गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून वाडीबंदर येथे उभारण्यात येत असलेल्या कोचिंग डेपोच्या कामाला वेग देण्यात आला आहे. या प्रकल्पाचे सुमारे १५ टक्के काम पूर्ण झाले असून, २०२७ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई विभागात वंदे भारत गाड्यांची तपासणी, दुरुस्ती आणि स्वच्छता अधिक कार्यक्षमतेने होणार असून, रेल्वे सेवेत लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे.