Central Railway food price hike : महागाईच्या झळा ! आता रेल्वे स्थानकांतील खाद्यपदार्थांचेही दर वाढले; सामान्य प्रवाशांच्या खिशाला आणखी कात्री

Mumbai Railway food rates : १ जूनपासून मध्य रेल्वेच्या स्टेशनवरील खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. याआधी पश्चिम रेल्वेने २०२५ मध्ये आणि २०२१ मध्ये दरवाढ केली होती. कॅटरिंग असोसिएशनने या निर्णयाला विरोध करत ब्रँडेड वस्तूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे.
Passengers buying snacks like Vada Pav and Samosa at a busy Central Railway station as new increased food prices come into effect from June 1.

Passengers buying snacks like Vada Pav and Samosa at a busy Central Railway station as new increased food prices come into effect from June 1.

esakal

Updated on

येत्या १ जूनपासून मध्य रेल्वेच्या विविध स्टेशनांवरील स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार आहेत. प्रवाशांना आता जेवणासाठी अधिक खर्च करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नव्या दरपत्रकानुसार, वडापावची किंमत १३ रुपयांवरून २० रुपयांपर्यंत वाढली आहे. तर समोसा १२ रुपयांवरून २० रुपयांना मिळणार आहे. याशिवाय रगडा पाव, सुकी भेळ, चटणी भेळ आदी लोकप्रिय पदार्थांच्या किंमतीतही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com