esakal | चंद्रकांत पाटील म्हणतात, शरद पवारांवर PhD करायचीये...
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील म्हणतात, शरद पवारांवर PhD करायचीये...

चंद्रकांत पाटील म्हणतात, शरद पवारांवर PhD करायचीये...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

'लगे राहो केजरीवाल' म्हणत दिल्लीतील जनतेने पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या पारड्यात भरभरून मतं दिलीत. ७० जागा असलेल्या विधानसभेत जनतेने अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास दाखवत तब्बल 63 जागा निवडून दिल्यात. दिल्लीतील निकाल स्वतः अमित शाह यांच्या देखील जिव्हारी लागलाय. 'गोली मारो'ची भाषा महागात पडल्याचं त्यांनी कबुल केलंय.

मोठी बातमी -  नवी मुंबई काबीज करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, वाचा..

अशात दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया देखील आपण पहिल्या आणि ऐकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील दिल्ली निवडणुकांवर प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना त्यांनी भारतीय जनता पार्टीला फैलावर घेत, "भाजप म्हणजे देशावरील आपत्ती आहे" अशी घणाघाती टीका केली होती.

दिल्ली निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रातील भाजपचे मातब्बर नेते दिल्लीत तळ ठोकून होते. यामध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विविध मोठ्या नेत्यांचा समावेश होता. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलंय. 

मोठी बातमी -  ते आले.. अन् अश्लील चाळे करत त्यांनी आमच्यासमोरच हस्तमैथून केलं.. 

"राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आपल्याला PHD करायची इच्छा आहे" अशी उपरोधिक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शरद पवार यांनी 50 वर्ष राजकारण केलं. तरीही राष्ट्रवादीचे दहाच्यावर खासदार निवडून आलेले नाहीत. शरद पवार यांची दिल्ली निकालांवरील प्रतिक्रिया फारशी गंभीरतेने घ्यायची गरज नाही. शरद पवारांचे कधीच दहा पेक्षा जास्त खासदार निवडून आलेले नसतानाही शरद पवार राजकारणाच्या केंद्रबिंदूत कसे काय राहतात? शरद पवार एकाच वेळी सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत एकत्रित कसे संवाद साधू शकतात? आपलं म्हणणं कसं पटवून देऊ शकतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला शरद पवारांवर पीएचडी करायची आहे", अशी उपरोधिक टीका चंद्रकांत पाटलांनी केलीये.    

शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने दिल्ली निकालांचा टेंभा मिरवू नये. काँग्रेसने शरणागती पत्करली नसती तर आपचा विजय झाला नसता, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणालेत. 

chandrakant patil sarcastically says i wish to do Phd on sharad pawar

loading image