esakal | चंद्रकांत पाटील म्हणतात 'मराठीत समजत नाही, इंग्लिशमध्ये सांगू ?'
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील म्हणतात 'मराठीत समजत नाही, इंग्लिशमध्ये सांगू ?'

चंद्रकांत पाटील म्हणतात 'मराठीत समजत नाही, इंग्लिशमध्ये सांगू ?'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात सध्या एकामागोमाग एक राजकीय वाद पाहायला मिळतायत. अशात बातमी महाराष्ट्र भाजपातील दोन मोठे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यातील कथित वादाची. गेल्या काळात भाजपत मोठ्या प्रमाणात प्रमाणात इनकमिंग झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता याच मेगाभरतीवरून महाराष्ट्र भाजपात अंतर्गत वाद आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. याला कारण आहे चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आणि त्यावर आलेलं सुधीर मुनगंटीवार यांचं उत्तर. 

आज परत्रकार परिषद घेत महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेतलेला पाहायला मिळतोय. आमच्यासोबत जे आलेत त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत. हा नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, भाजपमध्ये पक्षाचा एक नेता निर्णय घेत नाही, समूह निर्णय पद्धती भाजपात आहे. मेगाभरतीचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीने घेतलेला आहे, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी कालच्या वक्तव्याबद्दल दिलं आहे. मी बोललो त्याचा मला पश्चाताप नाही, भाजपातील मेगाभरतीचा आनंद आहे असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

मोठी बातमी - नवा दिवस नवा वाद; आदित्य ठाकरे संजय राऊतांना म्हणतात..

काय म्हणालेत चंद्रकांत पाटील ?

 • मी आकुर्डीत काय बोललो याची क्लिप आणली आहे 
 • पत्रकारांनी आणि माध्यमांनी तुमचे मुद्दे आम्हावर थोपवू नका 
 • सुधीर मुनगंटीवार आणि माझं सकाळीच बोलणं झालं 
 • महाराष्ट्रातील एकही पार्टी अशी नाही जी कार्यकर्त्यांची पार्टी आहे 
 • भारतीय जनता पार्टी अटलजींची देखील पार्टी नव्हती आणि ती नरेंद्र मोदी यांची देखील पार्टी नाही. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. 
 • बाहेरून जे आलेत त्यांना हे समजावून सांगण्याची व्यवस्था भाजपमध्ये आहे आणि म्हणूनच भाजपात सर्वजण सुखात आहेत.
 • २०१४ आणि २०१९ नंतर जे-जे आलेत त्यातील कुणीही परत गेलेले नाही  

मोठी बातमी- रावसाहेब दानवेंचे जावई राज ठाकरे यांच्या भेटीला; कुरुष्णकुंजवर खलबतं

 • बाकीच्या पक्षांमध्ये एक नेता निर्णय घेतो, त्यांच्या त्यांच्या लेव्हलवर ते योग्य देखील असेल. मात्र आमच्या पक्षात कोअर कमिटी आहे. \
 • कोणता चांगला नेता आमच्या पार्टीत येऊ इच्छित असेल तर त्याला काय जबाबदारी द्यायला हवी? याबाबत कोअर कमिटीमध्ये निर्णय घेतला जातो 
 • मी कुणालाही बाहेर काढा असं म्हंटलेलो नाही 
 • सुधीर मुनगंटीवार जे बोलले तेच मलाही सांगायचंय, आमची पार्टी कुणाच्याही मालकीची नाही.
 • पत्रकारांनी कोणतेही वेगळे निष्कर्ष काढू नयेत. 

मोठी बातमी- वाहनांसाठी आकर्षक क्रमांक ...नको रे बाबा!

 • आमच्यात जे-जे आलेत त्यांचा मला अभिमान आहे, त्यांचा आम्हाला फायदा झाला, आमची पार्टी वाढवायला आम्हाला फायदा झाला.
 • ते त्यांच्या त्यांच्या जुन्या कार्यपद्धतीतून आल्याने इथली कार्यपद्धती त्यांना समजावून सांगत असताना, ते देखील ती कार्यपद्धती आत्मसाद करतायत.
 • त्यांच्या येण्याचा पश्चाताप नाही, पचतावा नाही, आम्हाला सर्वांचा अभिमान आहे
 • पत्रकारांना हे मराठीत समजत नसेल तर इंग्रजीत सांगू का ?

चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद 

maharashtra bjp president chandrakant patils press conference on mass intake in bjp and reaction of sudhir mungantiwar