esakal | दोन पाचशे नाहीत तर राज्यातून तब्बल 'इतक्या' हजार गाड्या झाल्यात जप्त   
sakal

बोलून बातमी शोधा

दोन पाचशे नाहीत तर राज्यातून तब्बल 'इतक्या' हजार गाड्या झाल्यात जप्त   

42 लाखांचा दंड जप्त, संचारबंदीचे 18 हजार गुन्हे तर पोलिसांवर हल्ल्याची 46 प्रकरण

दोन पाचशे नाहीत तर राज्यातून तब्बल 'इतक्या' हजार गाड्या झाल्यात जप्त   

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई - देशांत कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाऊन सुरु केल्यानंतर देखील या लॉकडाऊन्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अशातच राज्यभरात चार हजार 337 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या काळात 42 लाखांचा दंडही वसूल केला आहे. या काळात 18 हजार 262 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरात कोरोनाचा आकडा दिवसे-दिवस वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण अशा परिस्थितीतही लॉकडाऊनचे अनेक महाभागाकडुन उल्लंघन सुरु आहे. यामुळे पोलिसांनी राज्यभरात धडक कारवाई आणि नाकांबदी लावली आहे. खाजगी वाहनाना विना परवाना बाहेर फिरण्यास सक्त मनाई असताना देखील काही माथफिरु दुचाकी, चारचाकी घेऊन बाहेर फिरत आहेत.

मोठी बातमी - "हा संयमाचा खेळ आहे, ज्याचा पेशन्स आधी सुटेल तो हरेल..." - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अशातच, राज्याभरातून 4 हजार 337 गाड्या जप्त करण्यात आली आहे. त्या अंतर्गत 42 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल आहे.  राज्यभरात पोलिसांवर हल्ल्याचे 47 प्रकरणं घडली आहे. त्यात 160 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत धारावी, गोवंडी परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याशिवाय संचार बंदीच्या कालावधीत बाहेर फिरल्यााप्रकरणी राज्यभरात 18 हजार 262 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मोठी बातमी - उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना वरळीकरांचं खुलं पत्र...

मुंबईतील दक्षिण मुंबईतून सुमारे 38 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  भेंडी बाजार, नळ बाजार, डोंगरी परिसरात अनेक नागरीक फिरताना दिसले. त्यामुळे त्या परिसरातही नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी 38दुचाकी व एक एसयूव्ही जप्त करण्यात आली आहे.

अफवा पसरवल्याप्रकरणी 66 गुन्हे
राज्यभरात अफवा पसरवल्याप्रकरणी 66 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत

check how many bikes are confiscated by maharashtra police during lockdown so far 

loading image