

Chembur Tree Collapse
ESakal
मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूर येथे मोठी दुर्घटना घडली होती. विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कुल बसवर भलेमोठे झाडं कोसळले होते. या घटनेत एका ११ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास सुरु असताना याप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. चेंबूर झाडं दुर्घटनेप्रकरणी सर्व निर्दोष असून अधिकारी-कंत्राटदारांना क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती आहे.