crime
ESakal
नितीन बिनेकर :
सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २० : चर्चगेट-बोरिवली लोकलच्या दिव्यांगांसाठी राखीव डब्यात आसनावरून झालेल्या वादातून ६२ वर्षीय प्रवाशाला धावत्या लोकलमधून ढकलण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. माहिम- वांद्रे स्थानकांदरम्यान घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा भाभा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी अमजद सफ्रुद्दीन शेख (वय ४८) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.