हृदयविकाराच्या झटक्‍याने गिर्यारोहकाचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्‍याने गिर्यारोहकाचा मृत्यू

कल्याण : डोंबिवली येथील 34 वर्षीय कृष्णा पार्टे या गिर्यारोहकाचा अंघाई किल्ल्यावर चढाई करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला आहे. डोंबिवली येथील ट्रेक क्षितीज संस्थेच्या 24 गिर्यारोहकांनी रविवारी (ता.12) सकाळी सात वाजता अंघाई किल्ला चढाईची मोहीम सुरू केली.

पहिला टप्पा पार केल्यानंतर रोपच्या सहाय्याने वर पोहोचलेल्या कृष्णा पार्टे यांना हृदयविकाराचा झटका आला. सुरुवातीला त्यांच्या सहकाऱ्यांना ते थकल्यामुळे विश्रांती घेत असावेत असे वाटले. मात्र त्यांच्या आवाजाला कृष्णा यांनी प्रत्युत्तर न दिल्याने त्यांचे सहकारी त्यांच्याजवळ गेले. त्यावेळी कृष्णा बेशुद्धावस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना प्रथमोपचार देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने सहकाऱ्यांनी त्वरित त्यांना उपचारार्थ खाली नेण्याचा निर्णय घेतला. जांभुळपाडा रस्त्यावरील परळी गावात त्यांना प्रथम उपचारासाठी नेण्यात आले. मात्र रविवार असल्यामुळे तेथील आरोग्य केंद्र बंद होते.

गावातील खाजगी डॉक्‍टरांनी पोलीसांचा ससेमिरा नको म्हणून उपचार करण्यास असमर्थता दर्शविली. अखेरीस दुपारी तीन वाजता कृष्णा यांना खोपोली येथील नगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालानुसार कृष्णा यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. 

web title : Climber death by heart attack

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com