esakal | पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर 'देवेंद्र फडणवीस' म्हणतात...

बोलून बातमी शोधा

पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर 'देवेंद्र फडणवीस' म्हणतात...

सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईत भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयात आले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधला.

पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर 'देवेंद्र फडणवीस' म्हणतात...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईत भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी अजित पवार यांचे प्रामुख्याने आभार मानलेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी,  "मी सर्वांना आश्वस्थ करू इच्छितो की पाच वर्ष हे सरकार चालेल" असं वक्तव्य केलंय. याचसोबत फणवीस यांनी  'मोदी है तो मुमकिन है' चा देखील नारा दिला.   

काय काय म्हणालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

 • या महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालंय. 
 • मी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो 
 • मी अजित पवार यांचे अभिनंदन करतो 
 • अजित पवार यांनी भाजपला सरकार चालवण्यासाठी समर्थन दिलं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार 
 • रामदास आठवले, विनायक मेटे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत हे सर्व मित्रपक्ष आपल्यासोबत आहेत
 • हे देखील खरं आहे, आपला एक मित्र आपल्या सोबत नाहीये
 • अजित पवार यांनी समर्थ देण्याचा निर्णय घेतला  
 • मी सर्वाना आश्वस्थ करू  इच्छितो की  'मोदी है तो मुमकिन है' 
 • चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजप एक नंबर पक्ष झाला त्याचे देखील अभिनंदन 
 • पुन्हा एकदा विश्वास देतो, पाच वर्ष अत्यंत मजबुतीने हे सरकार काम करेल 
 • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे सरकार येत्या काळात काम करताना दिसेल

दरम्यान आता येत्या काळात महाराष्ट्रात नवीन राजकीय नाट्य पाहायला मिळणार हे मात्र नक्की.  

आणखी  महत्त्वाच्या बातम्या : 

रात्री राष्ट्रवादीसोबत अन् सकाळी फडणवीसांसोबत; अजित पवारांना घेतले फैलावर

राज्याला मजबूत व स्थिर सरकार मिळाले : हर्षवर्धन पाटील

अजित देणार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?

WebTitle : cm fadanavis after taking oath as CM of maharashtra