महाशिवआघाडीचा मसुदा तयार; पक्षप्रमुखांचे शिक्कामोर्तब बाकी!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

लवकरच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हा मसुदा पाठवून त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. 

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या समन्वय समितीची संयुक्त बैठक गुरुवारी (ता.14) पार पडली. या बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा अंतिम करण्यात आला असून तिन्ही पक्षप्रमुखांना तो तातडीने पाठवण्यात येईल. त्यांच्या मान्यता घेऊन पुढील चर्चा सुरू होतील, अशी माहिती काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सत्तास्थापनेसाठी आज या तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. यामधे किमान समान कार्यक्रमावर सखोल चर्चा झाली.

- क्रितीच्या 'मिमी' मध्ये दिसणार ही मराठमोळी अभिनेत्री, पाहा फोटो

यानंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ज्यावेळी तीन पक्ष एकत्र येतात, तेव्हा काही बाबींवर सहमती करताना वेळ लागतो. तरीही आज या तिन्ही पक्षाचा सत्तेतला किमान समान कार्यक्रमाचा मसुदा अंतिम झाला आहे.

- शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे

लवकरच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हा मसुदा पाठवून त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. 

- शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर; वाचा काय घडले?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Combine Draft of Shivsena NCP and INC is ready for Maharashtra Government formation