Viral | पोलीस स्टेशन लय भारी! एकदा तरी भेट द्याच; Google वरील अजब कमेंट नक्की वाचा. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naya Nagar Police Station
Viral | पोलीस स्टेशन लय भारी! एकदा तरी भेट द्याच; Google वरील अजब कमेंट नक्की वाचा.

Viral: 'पोलीस स्टेशन लय भारी! एकदा भेट द्याच'

पोलीस स्टेशनच्या (Police Station) नुसतं समोरून जायचं म्हटलं तरी लोक घाबरतात. शहाणा माणूस पोलीस स्टेशनला जायची वेळ येऊ नये, यासाठी सर्व ती काळजी घेत असतो. परंतु मीरा भाईंदर (Mira Bhayandar) येथील नया नगर (Naya Nagar) पोलीस स्टेशनवरील एका महिलेची कमेंट वाचून सगळेच चकीत झालेत. हे पोलीस स्टेशन मध्ये माझी खूपच छान आहे, तिथं माझी चांगली काळजी घेतली. मोफत खाणं, मोफत राहणं, नुसती मजा...प्रत्येकानं एकदा तरी येथे जायलाच हवं', अशी गमतीशीर प्रतिक्रिया (Funny Comments) या महिलेने केलीये.

इंटरनेटवर (Internet) अनेक संस्था, कार्यालयं, हॉटेल्स, दुकानं अशा विविध आस्थापनांची माहिती असते. त्या संस्थेच्या नावाखाली त्या संस्थेची प्रोफाइल, तिथं जायचं कसं, जवळपास काय आहे अशा गोष्टींसोबतच खाली रिव्ह्यू आणि कमेंटचा ऑप्शन असतो. ज्या लोकांनी तिथं भेट दिली आहे, त्यांना काय अनुभव आला हे लिहीत असतात. मीरा भाईंदरमधील नया नगर पोलीस स्टेशनचीही माहिती गुगलवर (Google) आहे. त्याखालील रिव्ह्यूच्या (Review) भागात लोकांनी अतिशय गमतीदार प्रतिक्रिया केल्या आहेत. एखाद्या हॉटेलवर जशा कमेंट यावात अशा प्रकारची या कमेंट आहेत. यातील एका महिलेने केलेली कमेंट वाचून सारेच चकीत झाले आहेत.

त्या महिलेने आपल्या कमेंटमध्ये म्हटलंय, 'मला अलीकडेच एलसीडी (LCD- एक प्रकारचे ड्रग्ज) घेतल्याप्रकरणी अटक झाली होती. मी कालच सुटलो. तुरुंग कर्मचारी अतिशय छान होतं. तेथील महिला कर्मचाऱ्यांनी माझी खूप काळजी घेतली. त्यांनी मला कोठडीत मोबाईल वापरू दिला. मला तुरुंगात अजिकात रटाळवाणं वाटलं नाही. तिथं वास्तव्य करणे समाधानकारक होतं. तिथले इतर कैदी मैत्रीपूर्ण आहेत. आम्ही तिथं खूप मजा केली. मोफत जेवण, मोफत राहणं, खेळ, कामाची काहीच चिंता नाही. हे माझ्यासाठी सुट्टीसारखे होतं. तिथं राहून भारी वाटलं. प्रत्येकानं कमीत कमी एकदा तुरुंगात जायलाच हवं. हा एक चांगला अनुभव होता. मला हे आवडलं.' अशी कमेंट या महिलेने केली आहे.

दरम्यान इतर व्यक्तींनीही गमतीदार कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलंय, मला धुम्रपानाच्या मालासह अटक केली होती. तुरुंग अपेक्षेपेक्षा छान होतं. जेवणात राजमा चावल होता हे चांगलं झालं. तेथील लोक खूप भारी होते. त्यांनी मला सिगारेटही दिली. मी लवकरच पुन्हा तिथे जाईन.'

काही लोकांनी त्यांचे वाईच अनुभवही व्यक्त केले आहेत. दरम्यान या प्रतिक्रिया गमतीने केल्या की तुरुंगात खरंच तसं घडलं याबद्दल लोक विचार करू लागले आहेत. परंतु काहीही म्हणा, या कमेंट वाचून हे पोलिस स्टेशन आहे की हॉटेल, हाच प्रश्न लोकांना पडत आहे.

टॅग्स :crimePolice Station