Vidhansabha 2019 : बुडत्या काँग्रेसला 'भाईं'चा हात (व्हिडिओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे बडे नेते पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश करत असल्याने काँग्रेसला मरणासन्न अवस्था आली आहे. असे असले तरी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार भाई जगताप 'इनऍक्शन' झाले असून, त्यांनी एकट्याने निवडणुकीची खिंड लढविण्यास सुरवात केली आहे.

- विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत मनसेचे ठरता ठरेना!

जगताप यांनी लहान टेम्पोवर स्वयंचलित स्क्रीन लावला असून, त्यावर काँग्रेस सत्तेत असताना केलेल्या विकासकामांचा प्रचार सुरू केला आहे. जगताप विधानपरिषदेतील आमदार असून, त्यांनीही केलेल्या कामांचा प्रचार ते करत आहे.

हा टेम्पो दक्षिण मुंबईतील नाक्यांवर थांबविण्यात आला असून, येणारे-जाणारे लोक क्षणभर थबकत आहेत.

- कागल नगरपरिषदेच्या विशेष सभेत राडा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Bhai Jagtap has begun to contest the assembly elections alone