
विक्रमगड, : विक्रमगड तालुका भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे; मात्र निसर्गाचा लहरीपणा, संकरित भाताच्या बियाण्यांच्या वाढलेल्या किमती, खतांचा तुटवडा व खर्च यामुळे शेतकऱ्यांना भातशेती नकोशी झाली आहे, परंतु अशा परिस्थितीतही शेतीत नवनवीन प्रयोग करून ती टिकवण्याचा अनोखा प्रयत्न काशिवली (निंबळेपाडा) गावातील अंकुश भोये यांनी केला आहे. भोये यांनी तब्बल 55 जातींच्या भाताच्या वाणाची लागवड सेंद्रिय पद्धतीने केली असून त्यांना भाताच्या वाणाची बॅंक तयार करायची आहे.
संकरित बियाणी व खतांचा भडीमार यामुळे तांदळाचा रुचकरपणा हरवला असून शेतीदेखील नापीक होत चालली आहे. विक्रमगड तालुक्यातील काशिवली गावातील अंकुश भोये यांनी मात्र भातशेतीत उल्लेखनीय कार्य करून भातशेतीला अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला आहे. अंकुश हे मागील चार वर्षांपासून सेंद्रिय शेती करत असून इस्कॉन या संस्थेशी त्यांची ओळख झाली. यातून संस्थेने त्यांना आपल्या शेतात विविध जातींचे बियाणे तयार करण्यास सुचवले. ज्यासाठी बियाणेदेखील उपलब्ध करून देण्यात आले.
अंकुश हे प्रयोगशील शेतकरी असून ते दरवर्षी भाजीपाला लागवड करतात, ज्यासाठी ते तंत्रज्ञानाचा वापरदेखील करतात, पण खत व घातक कीटकनाशकांऐवजी ते सेंद्रिय शेतीचा अवलंब करतात. जे भविष्यात शेतीत क्रांती घडवून आणणारी बाब आहे. अंकुश यांनी सेंद्रिय शेती बचत गट नावाने समूह शेती करून भाताची सिड्स बॅंक तयार केली असून यात त्यांना मधुकर निमला, परशुराम तरे, प्रकाश निमला, सदानंद टोकरे, हरेश तुंबडा आदी शेतकरी सहकार्य करीत आहेत.
55 जातींचा भात वाणांचा प्रयोग -
कसबइ, पाचएकी, झिनी, वाडा कोलम, मसाला जव्हार, अश्विनी जव्हार, काल कुडई, डुनडुन डहाणू, डांगी, कर्जत, तोरण्या, गावरान बासमती, नजर भात, पालघर 3 अशा तब्बल 55 प्रकारचे भात भोये यांनी आपल्या एक एकर शेतीत प्रायोगिक तत्त्वावर लावले. जपानी पद्धतीने लावलेल्या व अवघ्या 100 ग्रॅम वजनाच्या भाताची पेरणी केली असता आता यातून 5 ते 10 किलो भात बियाणे तयार झाले आहे. पुढील वर्षी अजून मोठ्या प्रमाणात लागवड करून पारंपरिक भात बियाण्यांची एक मोठी सिड्स बॅंक त्यांना तयार करायची आहे.
दरवर्षी 6 हजार रुपयांचे बिन भरवश्याचे बियाणे व 10 हजार रुपयांचे खत लागत असे. मात्र, मी केलेल्या सेंद्रिय शेतीने खतांचा खर्च वाचला असून शेतीचे होणारे नुकसानही टाळता आले आहे. भाताच्या दुर्मिळ व नष्ट होत चाललेल्या जाती आम्ही संवर्धन व साठवण करणार असून याचा लाभ नक्कीच इतर शेतकऱ्यांना होईल. तसेच अनेक नामशेष होत चालेल्या बियाण्याचे संवर्धन होईल.
- अंकुश भोये, प्रयोगशील शेतकरी
(संपादन : वैभव गाटे)
conservation of Rare Rice Varieties by Farmers in vikramgad
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.