
खारघर : कोरोनाच्या धास्तीमुळे बहुतांश दवाखाने बंद असल्याच्या बातम्या येत आहेत; मात्र खारघरमधील डॉक्टर असोसिएशनने परिसरात विविध रोगांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची नावे, पत्ता आणि संपर्क क्रमांकाची यादी सोशल मीडियावर प्रसारित करून खारघरवासियांना सेवेसाठी तत्पर आहोत, असा दिलासा दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्वांत मोठा नोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक आहे; मात्र शहरात केवळ पालिकेचे एकच प्राथमिक केंद्र आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावले असून, त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सगळीकडे लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यातून रुग्णालये, दवाखाने यांसारख्या जीवनावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.
दरम्यान, नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही डॉक्टरनी बंद केलेले लहान-मोठे खासगी दवाखाने सुरू करण्यात यावे, अशी सूचना केली होती. खारघरमधील काही दवाखाने सुरू होते. दरम्यान, अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर खारघर परिसरातील जवळपास दीडशे डॉक्टरांनी आपले लहान-मोठे दवाखाने सुरू करून रुग्णास रुग्णालयात येता यावे यासाठी रुग्णालय, वेळ, पत्ता आणि डॉक्टरचे संपर्क क्रमांकाची यादी समाजमाध्यमावर प्रसिद्ध करून खारघरवासियांना दिलासा दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
खारघर परिसरात दंत रोगावर उपचार करणारे डॉक्टर मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र रुग्णावर उपचार करताना रुग्णाच्या मुखाशी थेट संपर्क होतो. त्यातील तीन ते चार डॉक्टरनी केवळ मार्गदर्शन करण्यासाठी दवाखाने सुरू ठेवले असून, इतर सर्व डॉक्टरनी क्लिनिक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे एका डॉक्टरने सांगितले.
खारघर डॉक्टर असोसिएशनमध्ये जवळपास दोनशेहून अधिक डॉक्टर आहेत. त्यातील जवळपास दीडशे डॉक्टरांनी आपली रुग्णालये सुरू केली आहेत. रुग्णास डॉक्टरबरोबर संपर्क साधता यावे यासाठी सर्व डॉक्टरची नावे आणि संपर्क क्रमांकाची यादी समाजमाध्यमावर प्रसारित केली आहे.
- डॉ. अशोक घोडके, अध्यक्ष, खारघर डॉक्टर असोसिएशन
Consolation to patients in Kharghar, service of hospitals started
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.