Mumbai University Graduate Senate Election
Mumbai University Graduate Senate Electionesakal

Mumbai University : शेलारांच्या 'त्या' तक्रारीनंतर 'सिनेट'चं राजकारण तापलं; शिवसेना, मनसे, BJP मध्ये जुंपण्याची शक्यता!

भाजप नेते आशीष शेलार यांच्या तक्रारीवरून १७ ऑगस्टला सिनेट निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता.
Summary

सिनेट निवडणुकांचा जाहीर कार्यक्रम अचानक रद्द केला व आता पुनर्नोंदणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) पदवीधर सिनेट निवडणुकीवरून (Graduate Senate Election) शिवसेनेचे दोन्ही गट आणि भाजपमध्ये आता वातावरण तापले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. सिनेटसाठी मतदार नोंदणी नव्याने करण्याकरिता विद्यापीठाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सरकारच्या दबावापोटी घेतलेला निर्णय असल्याची टीका ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून करण्यात आली आहे.

दुसरीकडे ज्यांची योग्यता नाही आणि ज्यांनी मुंबई विद्यापीठात कधीही काम केले नाही अशा व्यक्ती निवडून येत असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. भाजप नेते ॲड. आशीष शेलार (Ashish Shelar) यांच्या तक्रारीवरून १७ ऑगस्टला सिनेट निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता.

Mumbai University Graduate Senate Election
हृदयद्रावक! पूजा करुन परतताना काळाचा घाला; ट्रकच्या भीषण अपघातात 13 जण ठार; मृतांत मुलांसह आठ पुरुष, चार महिलांचा समावेश

त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात असताना विद्यापीठाने काल व्यवस्थापन परिषदेत मतदारांच्या छाननीसाठी नेमलेल्या त्रिस्तरीय समितीचा अहवाल स्वीकारत ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान निवडणुकीसाठी मतदारांची नव्याने नोंदणी करण्याचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने त्याविरोधात युवा सेना आणि इतर संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

Mumbai University Graduate Senate Election
Indian Football : कोल्हापूरला मिळाला बहुमान! 'वेस्टर्न इंडिया फुटबॉल'च्या उपाध्यक्षपदी मालोजीराजेंची पाचव्यांदा निवड

पदवीधर सिनेट निवडणुकीसंदर्भात ठाकरे गट युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर युवा सेना सचिव वरुण सरदेसाई म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला पराभव होण्याची भीती असल्याने त्या मागील काही वर्षांत होऊ दिल्या जात नाहीत. अशीच बाब मुंबई विद्यापीठाच्या सिनेट पदधीवर निवडणुकीच्या संदर्भात भाजपकडून केली जात आहे. त्यांच्या विद्यार्थी संघटनेचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्यानेच निवडणुका स्थगित करणे वा पुढे ढकलण्याचा घाट भाजपकडून घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Mumbai University Graduate Senate Election
Loksabha Election : महायुतीला बाजूला ठेवून भाजपची लोकसभा लढवण्याची तयारी? शिंदे, अजित पवार गट अस्वस्थ

भाजपचे आमदार ॲड. आशीष शेलार म्हणाले, मतदार याद्यांतील हा एक संघटित आर्थिक घोटाळा आहे. त्यामुळे या प्रकरणी फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी सिनेट निवडणुकांवर नियंत्रण ठेवण्याकरिता निवृत्त न्यायाधीश किंवा आयुक्तांची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.

संतोष गांगुर्डे म्हणाले, कोणतीही निवडणूक प्रक्रिया लोकशाहीचा उत्सव असतो. सिनेट निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र मुंबई विद्यापीठ प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेची खिल्ली उडवली आहे. मनविसेच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आम्ही आमची रणनीती ठरवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

Mumbai University Graduate Senate Election
Govind Pansare Case : गोविंद पानसरे हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर; साक्षीदाराने ओळखले रेकी करणाऱ्याचे छायाचित्र

निर्णय नैतिकतेत फेल

निवडणुकांचा जाहीर कार्यक्रम अचानक रद्द केला व आता पुनर्नोंदणीचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाला तो नियमांच्या चौकटीत बसवता येईलही; पण नैतिकतेत तो पूर्ण फेल झाला आहे, असे छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com