हृदयद्रावक! पूजा करुन परतताना काळाचा घाला; ट्रकच्या भीषण अपघातात 13 जण ठार; मृतांत मुलांसह आठ पुरुष, चार महिलांचा समावेश

ट्रकला (Truck Accident) वाहनाची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात लहान मुलासह १३ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
Road Accident on Bengaluru-Hyderabad Highway Chikkaballapur
Road Accident on Bengaluru-Hyderabad Highway Chikkaballapuresakal
Summary

जिल्हा पोलिस अधीक्षक नागेश म्हणाले की, दाट धुक्यामुळे रस्ता दिसत नसल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

बंगळूर : चिक्कबळ्ळापूर (Chikkaballapur) शहराच्या हद्दीतील चित्रावतीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला (Truck Accident) वाहनाची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात लहान मुलासह १३ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

राष्ट्रीय महामार्ग ४४ वर काल, गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. या अपघातात आठ पुरुष, चार महिला आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. अरुणा (वय ४०, रा. दोड्डबळ्ळापूर), त्यांचा मुलगा ऋत्विक यतीन (६ वर्षे), सुब्बम्मा (रा. बसवेश्वरनगर, बंगळूर), पेरुमल, कोट्टाचेरम, नरसिंहमूर्ती, कवल बैरसंद्र आणि चालक नरसिमप्पा अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Road Accident on Bengaluru-Hyderabad Highway Chikkaballapur
Tiger Claw Case : वाघाच्या पंजाप्रकरणी 'बिग बॉस'च्या स्पर्धकाला अटक; अनेक सेलिब्रिटी अडचणीत, अभिनेत्यांच्या घरांची झडती

उर्वरितांची ओळख पटविण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. आयुधपूजेच्या निमित्ताने आपापल्या गावी गेलेल्या मजुरांनी कुटुंबियांसमवेत आनंदाने उत्सव साजरा केला. रात्री बंगळूरला परतण्यासाठी आंध्रप्रदेशातून आलेल्या वाहनामध्ये ते सर्व चढले. वाहन चालकाने ठिकठिकाणी उभे असलेल्या एकूण १३ जणांना घेऊन बागेपल्ली-चिक्कबळ्ळापूरमार्गे बंगळूरकडे वेगाने येत होता.

काल सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चिक्कबळ्ळापूर ग्रामीण पोलिस स्टेशनअंतर्गत चित्रावतीजवळ येत असताना रस्त्याच्या कडेला सिमेंट घेऊन जाणारा ट्रक उभा होता. ट्रकला वाहनाने मागून जोराची धडक दिली आणि भीषण अपघात घडला. स्थानिक नागरिकांनी वाहनाच्या मागील दरवाजे काढून अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. गंभीर जखमींना रुग्णालयात नेत असताना वाटेतच सातजणांचा मृत्यू झाला.

Road Accident on Bengaluru-Hyderabad Highway Chikkaballapur
Mysore Dasara : जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाची जंबो सवारीने सांगता; अभिमन्यू हत्तीने वाहून नेली 750 किलो सोन्याची अंबारी

तर, रुग्णालयात एका महिलेचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक नागेश व चिक्कबळ्ळापूर ग्रामीण स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मृतांचे ओळखपत्र आणि मोबाईलवरून कुटुंबियांना माहिती दिली. चिक्कबळ्ळापूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारासमोर गावागावांतून आलेले शोकाकुल कुटुंबियांचे आक्रोश हृदयस्पर्शी होता.

Road Accident on Bengaluru-Hyderabad Highway Chikkaballapur
Gas Cylinder च्या स्फोटात कऱ्हाड हादरलं! दोन मुलांसह सात जण होरपळून जखमी, पाच घरांचं 20 लाखांचं नुकसान

दाट धुक्यामुळे अपघात

जिल्हा पोलिस अधीक्षक नागेश म्हणाले की, दाट धुक्यामुळे रस्ता दिसत नसल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या ट्रकचालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रवींद्र यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com