esakal | दिलासादायक..! मुंबईतील मृत्युदरात घट; रुग्ण वाढीचा वेगही मंदावला
sakal

बोलून बातमी शोधा

दिलासादायक..! मुंबईतील मृत्युदरात घट; रुग्ण वाढीचा वेगही मंदावला

महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्युदर निम्म्याने कमी झाल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी बाधित रुग्णांचा मृत्युदर सरासरी 6.3 टक्के एवढा होता. तो आता कमी झाला असून सरासरी 3.9 टक्क्या पर्यंत खाली आला आहे. 

दिलासादायक..! मुंबईतील मृत्युदरात घट; रुग्ण वाढीचा वेगही मंदावला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्युदर निम्म्याने कमी झाल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी बाधित रुग्णांचा मृत्युदर सरासरी 6.3 टक्के एवढा होता. तो आता कमी झाला असून सरासरी 3.9 टक्क्या पर्यंत खाली आला आहे. 

ही बातमी वाचली का? बॉलिबूड कलाकारांची इरफान खानला श्रद्धांजली

केंद्रीय समितीने आपल्या निष्कर्षांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येचे विश्लेषण करून त्याआधारे महापालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांचा मृत्यू दर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा कमी असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर दर शंभर बाधित रुग्णांना मागे सरासरी 4.3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. तर महानगरपालिका क्षेत्रातील दर शंभर बाधित रुग्णांना मागे सरासरी 3.9 रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. काही दिवसांपूर्वी पालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांचा मृत्युदर सरासरी 6.3 टक्के एवढा होता.

ही बातमी वाचली का? नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढतीये; वाचा आजची आकडेवारी

कोविड 19 या संसर्गजन्य आजाराने बाधित झालेल्या रुग्णांच्या वाढीचा वेग महानगरपालिका क्षेत्रात मंदावत असल्याचा निष्कर्षही केंद्र शासनाद्वारे नियुक्त समितीने काढला आहे. या निष्कर्षांनुसार 17 ते 27 एप्रिल दरम्यान रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांवर गेला आहे. जो यापूर्वी 8.3 दिवस असा होता. देशाच्या पातळीवर रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी हा 9.6 दिवस एवढा आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर हा कालावधी 8.9 दिवस इतका आहे.

ही बातमी वाचली का? हुश्श...अखेर ककोट्याहून २७ विद्यार्थ्यांसह ७ पालक परतले 

महापालिका क्षेत्रातील 'कोरोना कोविड 19' या संसर्गजन्य आजाराच्या प्रसारास अटकाव व्हावा, यासाठी या अनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व पाठपुरावा देखील सातत्याने करण्यात आला. ज्यांच्या बाबत घरच्या-घरी विलगीकरण करणे आव्हानात्मक आहे, अशा व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवले. शिवाय रूग्ण एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ नये, यासाठी  कंटेनमेंट झोन तयार केले. 

ही बातमी वाचली का? दिलासादायक... ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कोरोनावर यशस्वी मात

रुग्णांचा कसून शोध
महानगरपालिका प्रशासनाने महापालिका क्षेत्रात या आजाराचे रुग्ण सापडायला सुरूवात झाल्यापासून रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली. परिणामी 26 एप्रिल पर्यंत तब्बल 1 लाख 19 हजार 477 रूग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधण्यात आले. यातील 21 हजार 53 हे हाय रिस्क गटातील संपर्क होते.  यातून 1 हजार 647 रूग्ण शोधता आले. 'कोरोना कोविड 19' चा प्रसार होऊ नये, म्हणून या रुग्णांच्या संपर्कातील लोकांपैकी ज्यांच्या घरी व्यवस्था होऊ शकते, अशा रुग्णांच्या बाबत घरच्याघरी विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

ही बातमी वाचली का? कर्र्जत, खोपोलीत मुसळधार पाऊस

चाचण्यांचे प्रमाण सर्वाधिक
महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत तब्बल 66 हजार चाचण्या करण्यात आल्या असून याचे प्रतीदशलक्ष व्यक्ती प्रमाण 5 हजार 71 एवढे आहे. तर तामिळनाडू, राजस्थान, नवी दिल्ली, केरळ  येथील हे प्रमाण अनुक्रमे 2,624; 1,220; 794 आणि 684 असे आहे.