कोरोनामुळे भाजी विक्रेत्यांचे फावले; भावात दुपटीने वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोनाचे संकट पाहून मुंबईतील अनेक किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाल्यांचे भाव वाढवले आहेत. अनेकांनी प्रतिकिलोमागे 10 ते 15 रुपयांनी वाढ केली तर काही ठिकाणी भाज्यांचे भाव दुप्पट झाले आहेत. भेंडी, तोंडलीने तर शंभरी गाठली आहे.

मुंबई : मुंबईतील सर्व भाजी विक्रेत्यांना एपीएमसी बाजारातून माल पुरवला जातो; परंतु कोरोनामुळे सध्या एपीएमसी मार्केट बंद आहे. त्यातच मंगळवारी (ता. 24) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर लगेच नागरिकांनी भाजी बाजारामध्ये गर्दी केली. हीच संधी साधून मुंबईतील अनेक किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाल्यांचे भाव वाढवले आहेत. अनेकांनी प्रतिकिलोमागे 10 ते 15 रुपयांनी वाढ केली तर काही ठिकाणी भाज्यांचे भाव दुप्पट झाले आहेत. भेंडी, तोंडलीने तर शंभरी गाठली आहे. त्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांचे कंबरडे मात्र मोडले आहे. 

ही बातमी वाचली का? Big Bajarचा मोठा निर्र्णय; लॉकडाऊनमध्ये घरपोच मिळणार धान्य, भाज्या...

भाजीपाला जीवनावश्‍यक वस्तूंचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहणार आहे; पण मुंबईतील सर्वच मंडईमध्ये एपीएमसी मार्केटमधून माल आणला जातो. सध्या एपीएमसी मार्केट बंद ठेवले आहे. माथाडी कामगार रजेवर आहेत. त्यामुळे इतर ठिकाणांहून माल आला तरी तो उतरवण्यासाठी कामगार नाहीत, अशी परिस्थिती भाजी विक्रेत्यांची झाली आहे. याचाच परिणाम भाज्यांचे भाव वाढले आहेत. 25 रुपये किलो असणारे टोमॅटो 40 रुपये किलो, तर कोथिंबीर 50 रुपये जुडीने विकली जात आहे. कारली 80 रुपये किलो आहेत. एपीएमसी मार्केट बंद आहेत. माल येत नाही. ग्राहकांकडून मागणी आहे. माल आल्यावर भाज्यांचे भाव पुन्हा पूर्ववत होतील, असे दादार भाजी मंडईतील विक्रेत्याने सांगितले. 

ही बातमी वाचली का? दारु मिळेना... म्हणून तळीराम लढवतायेत ही शक्कल! 
दादर येथील भाजी मार्केटमध्ये लोक आता एकावेळी गर्दी करत नाहीत. टप्पाटप्प्याने लोक खरेदीसाठी येतात. किराणा मालाच्या दुकानात एकाच वेळी चार व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. लोकांना रांगेत उभे राहावे लागते, असे चित्र दादरमधील बाजरपेठेतील आहे. 

ही बातमी वाचली का? टवाळखोरांना रोखण्यासाठी कर्र्जतमध्ये नाकाबंदी 

एपीएमसी मार्केट बंद आहे. दुसरीकडून माल आला तरी माल उतरवायाला कामगार नाही. सध्या पुरेसा माल आहे. त्यामुळे आमच्या येथे तरी भाज्यांच्या भावात फार वाढ झाली नाही. माल वेळेवर आला नाही तर भाज्यांच्या भावात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 
- किरण झोडगे, अध्यक्ष, भायखळा भाजी मंडई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona shoots vegetable vendors; Double increase in prices