नवी मुंबईची होऊ शकते धारावी! नागरिक काय म्हणतायेत, तुम्हीच वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

मनपा हद्दीतील गावठाण भागात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याला येथील दाटीवाटीत असणारी अनधिकृत घरांची गर्दी कारणीभूत असून यावर योग्य वेळीच मनपा प्रशासनाने दूरदृष्टी ठेवून काम केले असते, तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. त्यामुळे भविष्यात नवी मुंबईत धारावीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

तुर्भे (बातमीदार) : मनपा हद्दीतील गावठाण भागात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याला येथील दाटीवाटीत असणारी अनधिकृत घरांची गर्दी कारणीभूत असून यावर योग्य वेळीच मनपा प्रशासनाने दूरदृष्टी ठेवून काम केले असते, तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. त्यामुळे भविष्यात नवी मुंबईत धारावीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ही बातमी वाचली का?  ऋषी कपूर यांची `ती` इच्छा अपूर्णच राहिली...

नवी मुंबईमध्ये गावठाण, झोपडपट्टी व माथाडी कॉलनीत मोठ्या प्रमाणात दाटीवाटीत बांधलेल्या अनाधिकृत बांधकामांविरोधात शेकडो नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार न पाडल्याने आज कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे.
-रवींद्र राजीवडे, नागरिक

 ही बातमी वाचली का? दिलासादायक... ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कोरोनावर यशस्वी मात

नवी मुंबईत स्वतंत्र औद्योगिक झोन असतानाही गावठाण व झोपडपट्टी भागात आजही मोठ्या प्रमाणात लघू उद्योग चालतात. या ठिकाणी अनेकदा आग लागण्याचे प्रकार घडले. परंतू त्याविरोधात नागरिकांनी तक्रार करूनही काहीही फायदा झाला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आताही येथे मोठे संकट येऊ शकते.
- प्रदीप म्हात्रे, नागरिक

 ही बातमी वाचली का? हुश्श...अखेर ककोट्याहून २७ विद्यार्थ्यांसह ७ पालक परतले 

मनपा अधिकारी अनाधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करत राहिले. त्यामुळे आजच्या घडीला कोरोना विषाणूसारख्या साथीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने दिघा, दिवागाव, कोपरखैरणे, सानपाडा, बेलापूर व वाशी येथे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
-अजय पवार, नागरिक

सध्या जे कोरोनासदृश संकट उभे आहे, त्याला मनपा अधिकारी जबाबदार आहेत. म्हणून मी आरोग्य मंत्रालय, राज्यपाल व जिल्हाधिकारी, ठाणे यांना तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
-मंगेश म्हात्रे, तक्रारदार, नवी मुंबई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The corona situation in Navi Mumbai is similar to Dharavi