ऋषी कपूर यांची `ती` इच्छा अपूर्णच राहिली...

ऋषी कपूर यांची `ती` इच्छा अपूर्णच राहिली...
ऋषी कपूर यांची `ती` इच्छा अपूर्णच राहिली...

मुंबई : अभिनेता इरफान खान याच्या निधनाने  बॉलिवूड हादरले असतानाच गुरुवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आली आणि साऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची एक इच्छा पूर्ण झालीच नाही; ती इच्छा म्हणजे मुलगा रणबीर कपूर याचे लग्न. ऋषी यांना रणबीरचे लग्न पाहण्याची इच्छा होती. त्यांची ही इच्छा आता अपूर्णच राहिली आहे. 

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन व्यक्तिमत्त्व असलेले ऋषी कपूर यांनी अचानक घेतलेली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ऋषी कपूर उपचारांसाठी परदेशात रवाना झाले. जवळपास 11 महिन्यांच्या उपचारांनंतर ते भारतात परतले आणि नव्या जोमाने पुन्हा कामालाही सुरुवात केली. आजारपणाच्या काळात त्यांची पत्नी नीतू, मुलगी रिद्धिमा आणि मुलगा रणबीर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. अभिनेत्री आलिया भट्टही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रणबीरसोबत गेली होती. 

रणबीर-आलियाचा विवाह आपल्या डोळ्यांदेखत व्हावा, असे ऋषी यांना मनापासून वाटत होते. ते भारतात परतल्यानंतर रणबीर-आलियाच्या लग्नाची बोलणीही सुरू झाली होती. आलियाची रणबीर आणि त्याच्या कुटुंबीयांसोबची कित्येक छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. ऋषी यांनीही रणबीर आणि आलियाचे नाते मान्य केले होते. 2020 मध्येच रणबीर-आलियाचे शुभमंगल करायचे नियोजन कपूर कुटुंबीयांनी केले होते. तशा चर्चाही सुरू होत्या. परंतु, रणबीर-आलिया यांच्या चित्रपटांच्या चित्रीकरणामुळे लग्न रखडले. अखेरीस आपल्या मुलाचा सुखी संसार पाहण्याची ऋषी यांची इच्छा अपूर्णच राहिली.

रणबीरचा निर्णय मान्यच
आपल्या लेकाचे थाटामाटात लग्न झाल्यावर आपण निवांत राहू, असे ऋषी यांना वाटत असे. रणबीर त्याला आवडत असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करू शकतो; त्याचे निर्णय तो घेऊ शकतो. त्याने घेतलेल्या निर्णयाबाबत नेहमीच मी खूश असेन, असे ऋषी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com