खासगी प्रयोगशाळेत चाचण्या कमी; पण पॉझिटिव्ह रुग्ण अधिक

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अहवालातील निष्कर्ष
Corona Patient
Corona PatientSakal media

मुंबई : राज्यात सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये (government and private labs) कोरोना चाचण्या (corona test) करण्यात येत आहेत. खासगीपेक्षा सरकारी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या अधिक झाल्या आहेत. तरीही खासगी प्रयोगशाळेमधील पॉझिटिव्ह अहवाल चार टक्क्यांनी अधिक असल्याचे (corona report positive) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने जाहीर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रयोगशाळा मिळून ८९.२६ टक्के म्हणजेच ६,११,७६,७०४ चाचण्या निगेटिव्ह (corona test negative) आल्या आहेत. (corona test less in private labs but corona positive patients more)

Corona Patient
महाराष्ट्र : आखाती देशांमध्ये व्यवसाय वाढणार; महाबीज परिषदेचा दुबई दौरा

दोन्ही प्रयोगशाळांमधील १०.७४ टक्के म्हणजेच ७३,५९,४०१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यात सरकारी प्रयोगशाळेमधील ९.२९ टक्के म्हणजेच ३९,११,४५६ आणि खासगी प्रयोशाळेमधील १३.०५ टक्के म्हणजेच ३४,४७,९४५ चाचण्यांचा समावेश आहे. सरकारीपेक्षा खासगी प्रयोगशाळांमधील पॉझिटिव्ह चाचण्यांचे प्रमाण ३.७६ टक्क्यांनी अधिक आहे.
राज्यात आतापर्यंत ११० सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करण्यात येत आहेत. काही ठराविक चार खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांची परवानगी देण्यात आली आहे.

सरकारी प्रयोगशाळांमध्ये मोफत सुविधा, अधिक केंद्रे आणि विश्वासार्हता असल्याने तिथे अधिक चाचण्या होत आहेत. परिणामी चाचण्यांचा ताण वाढत असल्याने अहवाल यायला उशीर होत आहे. त्या तुलनेत खासगी प्रयोगशाळेमधील अहवाल काही तासांत येतात. त्यामुळे खासगी प्रयोगशाळेमधून चाचणी करून घेण्याकडे रुग्णांचा कल अधिक आहे.

Corona Patient
दहिसर SBI बँक दरोडा: बुटामुळे दरोडेखोर अटकेत, श्वानानं काढला माग

ओमिक्रॉन संसर्ग पसरल्यापासून नागरिक स्वतःहून कोरोना चाचण्या करून घेत आहेत. चाचण्यांचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांनी वाढले आहे. सरकारी केंद्रांवर मोफत आणि विश्वासार्हता असल्याने तिथे चाचण्या करून घेण्याकडे नागरिकांचा अधिक कल दिसतो.
- डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय.

राज्यात आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्या ः ६,८५,३६,१०५
सरकारी प्रयोगशाळेतील चाचण्या ः ४,२१,१४,७९१ ९०.७१ टक्के (३,८२,०३,३३५) अहवाल निगेटिव्ह
खासगी प्रयोगशाळेतील चाचण्या ः २,६४,२१,३१४ ८६.९५ टक्के (२,२९,७३,३६९) अहवाल निगेटिव्ह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com