#CoronaOutbreak सरकारी जाहिरातींमुळे प्राण्यांचा जीव धोक्यात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

मुंबई: कोरोनाच्या जनजागृतीसाठी महापालिका आणि रेल्वेने लावलेले पोस्टर प्राण्यांच्या जीवावर बेतू लागले आहे. बोरिवली पूर्वेला एका भटक्‍या श्‍वानाला नागरिक दगडाने पिटाळून लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळाले. आज मालाड-मढ परिसरात एका जर्मन शेफर्ड जातीच्या श्‍वानाला बेवारस सोडण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका जाहिरातीतून संभ्रम निर्माण झाला आहे. ती जाहिरात हटवण्यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. 

मुंबई: कोरोनाच्या जनजागृतीसाठी महापालिका आणि रेल्वेने लावलेले पोस्टर प्राण्यांच्या जीवावर बेतू लागले आहे. बोरिवली पूर्वेला एका भटक्‍या श्‍वानाला नागरिक दगडाने पिटाळून लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळाले. आज मालाड-मढ परिसरात एका जर्मन शेफर्ड जातीच्या श्‍वानाला बेवारस सोडण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका जाहिरातीतून संभ्रम निर्माण झाला आहे. ती जाहिरात हटवण्यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. 

'स्लॅपींग थेरपी', आता कानाखाली मारल्याने मिळेल ग्लोईंग त्वचा; वाचा भन्नाट बातमी..

कोंबड्यांमुळे कोरोना पसरण्याची भीती असल्याची अफवा असल्याने चिकनचा दर प्रचंड पडला आहे. त्यामुळे अखेरीस पालघरमध्ये जिवंत कोंबड्या पोल्ट्रीमालकांनी जमिनीत पुरल्या. जंगली आणि पाळीव प्राण्यांच्या जवळ जाण्यापूर्वी काळजी घ्या, असा सल्ला देणारे फलक महापालिकेने शहरात विविध ठिकाणी झळकावले आहेत. रेल्वेनेही जंगली आणि पाळीव प्राण्यांच्या जवळ जाणे टाळा, असे पोस्टर्स लावले आहेत. अशा पोस्टरबाजीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असा दावा प्राणिमित्रांकडून केला जात आहे. महापालिकेला फलक काढण्याची विनंती करण्यात आली आहे. काही ठिकाणचे फलक काढण्यात आले असल्याचे प्राणिमित्र पवन शर्मा यांनी सांगितले. काही ठिकाणी पाळीव प्राणी घराबाहेर सोडल्याचे आढळले आहे. त्यामुळे अशा जाहिरातींतून जनजागृती होण्याऐवजी संभ्रम निर्माण होत आहे असेही ते म्हणाले.

घृणास्पद ! आपल्या मित्रांना 'त्याने' दिली होती पत्नीचं शरीरसुख घेण्याची परवानगी...

अशाच पोस्टरमुळे बोरिवलीत स्थानिक नागरिकांनी एका मोकाट श्‍वानावर हल्ला केला. नागरिक त्याला दगड मारून हुसकावून लावत होते. ते पाहून काही प्राणिमित्रांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्या वेळी श्‍वानामुळे कोरोना पसरण्याची भीती असल्याने त्याला मारत असल्याचे नागरिकांनी सांगितल्याचे बॉम्बे ऍनिमल राईट्‌सचे संस्थापक विजय किशोर म्हणाले. आज मालाड येथील मढ बीचवर एका जर्मन शेफर्ड श्‍वानाला मोकाट सोडण्यात आले. सहसा निरोगी श्‍वानाला बेवारस सोडले जात नाही, त्यामुळे कोरोनाच्या भीतीनेच त्याला सोडले असावे असेही त्यांनी सांगितले. पालिकेने आतापर्यंत सात पोस्टर काढले आहेत, पण अद्याप काही फलक बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. 

जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठपुरावा 
महापालिकेकडे संबंधित फलकाबाबत विचारणा केली असता जागतिक आरोग्य संघटनेकडून माहिती घेतली असल्याचे सांगण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतीय कार्यालयाच्या संकेतस्थळावर मांजरीपासून एक आजार पसरू शकतो असे पोस्टर आहे, पण त्यात कोठेही कोरोनाचा उल्लेख नाही. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. 
 

CoronaOutbreak Government advertisements endanger the lives of animals


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaOutbreak Government advertisements endanger the lives of animals