नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम, वाचा कुठे किती रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

नवी मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे सत्र अद्याप थांबलेले नाही. डॉक्टर, परिचारीका, डिलीव्हरी बॉय यानंतर आता बेस्ट बसच्या वाहकालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे सत्र अद्याप थांबलेले नाही. डॉक्टर, परिचारीका, डिलीव्हरी बॉय यानंतर आता बेस्ट बसच्या वाहकालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आज दिवसभरात नवी मुंबईत विविध ठिकाणी 14 कोरोना रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 145 पर्यंत पोहोचला आहे.

हे ही वाचा : मनसे नेते अमित ठाकरेंचा डॉक्टरांसाठी पुढाकार, 1000 पीपीई किट्सचा मार्डला पुरवठा

महापालिकेच्या आरोग्य विभागाला सोमवारी 174 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 160 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह असून 14 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. सिवूड्स येथील सेक्टर 50 येथे राहणाऱ्या एका डॉक्टरमुळे त्याच्या निकटच्या संपर्कातील सिवूड्स सेक्टर 50 येथे राहणाऱ्या कुटुबांतील 3 महिला व एक पुरूष अशा चार जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

मोठी बातमी : '८ डिसेंबर 2020 ला संपूर्ण जग होणार COVID19 मुक्त; भारताची तारीख आहे २०...

कोपरखैरणे सेक्टर 23 येथे कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याच्या संपर्कात आल्यामुळे त्याची 55 वर्षीय पत्नी आणि 6 वर्षांची नात अशा दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ऐरोलीतील कोरोनाबाधित बँक व्यवस्थापकाच्या संपर्कातील एका महिलेला लागण झाल्यानंतर त्या महिलेची 35 वर्षीय बहिण आणि 9 वर्षांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. रबाळे येथील रिलायन्स लाईफ सायन्सेस कंपनीतील एका कामगारामुळे दुसरी महिला कामगार पॉझिटीव्ह आली आहे.

महत्वाची बातमी : कोरोनाला थोपवण्यासाठी मुंबईतही करारावर नर्सची भरती होणार, पण...

रबाळे येथील सॅन्डोज कंपनीतील आणखी एका कर्मचाऱ्याला लागण झाली. जुईनगर सेक्टर 23 येथे राहणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलची बायको आणि आईला कोरोनाची लागण झाली आहे. जुईनगर सेक्टर 24 येथील बेस्ट बसच्या वाहकाला कोरोनाची लागण झाली आहे. दिघ्यातील नामदेव नगर येथे राहणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीच्या छातीत दुखू लागल्याने त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्या रुग्णालयातून दुसरीकडे स्थलांतरीत करताना रुग्णवाहिकेत हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची चाचणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.

Corona's havoc in Navi Mumbai Death of a patient; The number of corona positive reached 145


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's havoc in Navi Mumbai Death of a patient; The number of corona positive reached 145