Coronavirus : मुंबई महापालिकेकडून आपल्या कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्वाच्या सूचना

bmc
bmc

मुंबई : सतत तीन महिने कोव्हिडचा सामना करुन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मानसिक दडपण येण्याची शक्यता आहे. यासाठी आवश्यकता भासल्यास कर्मचाऱ्यांनी समुपदेशन करुन घ्यावे अशी सुचना प्रशासनाने केली आहे.

महापालिका, एमपॉवर आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टने मानसिक समुपदेशनासाठी हेल्पलाईन सुरु केली आहे‍. लॉकडाऊन काळात सामान्य नागरीकांच्या समुपदेशनसाठी ही हेल्पलाईन वापरली जात आहे. त्याच बरोबर पालिकेनेही आता त्यांच्या कर्मचाऱ्यांना आवश्यकता असल्यास या हेल्पलाईनवरुन समुपदेशन घेण्याची सुचना केली आहे.

करोना काळात सतत तीन महिने महापालिकेचे कर्मचारी कामगार काम करत आहेत. यातील किमान 15 हजारहून अधिक वैद्यकिय कर्मचारी तसेच इतर कर्मचारी आणि कामगारांचा प्रतिबंधित क्षेत्र, कोरोना बाधित तसेच हायरिस्क व्यक्तीशी संबंध येत आहे. आता पर्यंत 2 हजारच्या आसपास कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काहीच्या कुटूंबियांनाही बाधा झाली आहे. यामुळे कर्मचारी कामगार दडपणा खाली येण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना ही सुचना करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Coronavirus Very important instructions to your Mumbai Municipal Corporation employees

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com