Mumbai Musical Road: मुंबईत देशातील पहिला म्युझिकल रोड! वाहनचालकांना जपान–दुबईसारखा फील येणार; पण कुठे? जाणून घ्या...

India’s First Musical Road Mumbai: नरिमन पॉइंटपासून उत्तरेकडे वरळीकडे, बोगद्यापासून सुमारे ५०० मीटर पुढे, ताशी सुमारे ६० किलोमीटर वेगाने गाडी चालवत असताना, तुमच्या गाडीत 'जय हो' चित्रपटातील एक गाणे वाजेल.
First Musical Road in Mumbai

First Musical Road in Mumbai

ESakal

Updated on

मुंबई : भारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई कोस्टल रोडवरून नरिमन पॉइंट ते वरळीपर्यंत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावर खास बसवलेल्या संगीतमय पट्ट्यांमुळे एक अनोखा ड्रायव्हिंग अनुभव मिळेल. असे रस्ते सध्या जपान आणि दुबईसारख्या देशांमध्ये अस्तित्वात आहेत. संगीतमय रस्ता असलेले मुंबई हे भारतातील पहिले राज्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com