esakal | '...तरच रेमडिसीवर इंजेक्शन वापरा'

बोलून बातमी शोधा

Remdesivir injection
'...तरच रेमडिसीवर इंजेक्शन वापरा'
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनुसार रेमडिसीवर रूग्‍णांमधील मृत्‍यूंच्‍या प्रमाणात प्रतिबंध करत नसून रुग्णालयातील उपचाराचा कालावधी प्रभावीपणे  कमी करत नाही. रेमडिसीवर इंजेक्शन अंतिम टप्प्यातील रुग्णालाच काही अटी वर देण्यात येत असले तरीही गंभीर आजारी असलेल्‍या किंवा मल्‍टीऑर्गन डायस्‍फंक्‍शनपासून पीडित असलेल्‍या रूग्‍णांमध्‍ये या औषधाचा वापर करू नये, असे स्पष्ट मत कोविड- 19 टास्‍क फोर्सचे सदस्‍य डॉ. राहुल पंडित यांनी मांडले. तर, सौम्य ते गंभीर रुग्णांना हे रेमडिसीवर दिले जाते. लक्षणे दिसून न येणाऱ्या रूग्‍णांमध्‍ये त्‍याची कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी संसर्गाच्‍या दुसऱ्या आणि दहाव्‍या दिवसादरम्‍यान या औषधाचा वापर करावा असे ही त्यांनी सुचवले.

कोरोना महामारी दरम्‍यान रेमडिसीवरच्या परिणामकारकतेला महत्त्व मिळाले असले तरी या औषधाच्‍या तुटवड्यामुळे हेल्‍थकेअर वर्कर, पुरवठादार आणि रूग्‍णांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तुटवड्यामागे अनेक कारणे आहेत. कोविड- 19 केसेसमध्‍ये वाढ, साठेबाजी आणि गंभीर संसर्ग असलेल्या रूग्‍णांसाठी औषधाचा वापर. पण, दुसऱ्या लाटेचा भयंकर परिणाम दिसून येत असताना सरकारने स्‍थानिक पातळीवर हे औषध मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध होण्‍यासाठी त्‍याच्‍या निर्यातीवर बंदी घातली आहे.

रेमडिसीवरचा वापर करण्‍याची योग्‍य पद्धत: औषधाला अधिक मागणी असली तरी त्‍याचा योग्‍यप्रकारे वापर करणे माहित असणे आवश्यक असल्याचे डॉ. पंडित यांनी सांगितले. या कोर्समध्‍ये सामान्‍यत: 5 दिवसांमध्‍ये 6 डोसेस दिले जातात (पहिल्‍या दिवशी 200 मिलीग्रॅम, त्‍यानंतर पुढील 4 दिवस 100 मिलीग्रॅम). या औषधाचा अधिक प्रमाणात वापर करू नये. गंभीर संसर्ग असलेल्‍या रूग्‍णांना हे औषध प्रीस्‍क्राइब केले जात नाही आणि औषध प्रीस्‍क्राइब करण्‍यापूर्वी रूग्‍णाची सखोल तपासणी केली जाते. हे औषध संसर्गाच्‍या 10 व्‍या दिवसानंतर प्रीस्‍क्राइब केले जात नाही. या औषधाचा योग्‍य वापर व पुरवठ्याची काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा: ''...मग आम्हाला उन्हाळी सुट्टी द्या'', शिक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रेमडिसीवर कसे काम करते?

विषाणूने मानवी पेशीमध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर पेशीत जेनेटिक घटक उत्‍सर्जित होतात. जे शरीराच्‍या विद्यमान यंत्रणेचा वापर करून शरीरभर पसरतात. संसर्गाच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर विविध मानवी प्रोटीन्‍स, विषाणू प्रोटीन्‍स यांची परस्‍परक्रिया होत असते. पुनरावृत्तीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये आरडीआरपी नावाचे प्रमुख व्‍हायरल प्रोटीन विषाणूचा स्रोत बनते. रेमडिसीवर आरडीआरपीवर थेट हल्‍ला करत काम करते. रेमडिसीवर आवश्‍यक असलेल्‍या 'फिडिंग'ची गरज पूर्ण करते. ज्यामुळे विषाणूचे प्रमाण अधिक वाढण्‍याला प्रतिबंध होतो.

मात्र, हे औषध हेपेटोटॉक्सिक असण्‍यासोबत यकृत पेशींना हानीकारक असल्‍याचे देखील आढळून आले. व्‍यावहारिकदृष्‍ट्या व्‍हायरलची पुनरावृत्ती पहिल्‍या 1 ते 7 दिवसांमध्‍ये संपते. 7 ते 8 दिवसांनंतर गंभीर कोविड- 19 आजारासंदर्भात दिसण्‍यात आलेली जटिलता दाहक प्रतिक्रियेमुळे (एसआयआरएस) आहे. म्‍हणून, सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये, म्‍हणजेच व्‍हायरल पुनरावृत्ती होत असलेल्‍या दुस-या ते दहाव्‍या दिवसांदरम्‍यान या औषधाचा वापर करावा. ज्‍यामुळे शरीरातील विषाणूचा प्रभाव कमी होईल.

------------------

(संपादन- पूजा विचारे)

covid 19 task force tell when use the remdesivir injection