मुंबईची वाटचाल कोव्हिड नियंत्रणाकडे; 15 दिवसांत तब्बल 'इतके' नागरिक बंधनातून मुक्त

समीर सुर्वे
Sunday, 16 August 2020

मलबार हिल येथे रुग्णवाढीचा दर 1.42 टक्के असून तो शहरातील सर्वाधिक दर आहे. त्या खालोखाल आर मध्य बोरीवली येथे 1.29 टक्के आहे.

मुंबई : महापालिका आणि आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे मुंबईतील कोरोनाचा संसर्ग नियंतत्रणात आल्याचे चित्र आहे. मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या जम्बो कोव्हिड केअर सेंटरवरील ताणही बऱ्यापैकी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यात मुंबईतील अनेक भागातील कोरोनाचा संक्रमण दर एक टक्क्यांहून कमी झाला आहे. 24 प्रभागांपैकी 16 प्रभागातील संक्रमणाचा दर 1 टक्‍क्‍यांहून कमी झाला आहे. त्याच बरोबर गेल्या 15 दिवसात 2 लाख 62 हजार नागरिक प्रतिबंधीत क्षेत्रांच्या बंधनातून मुक्त झाले आहेत.

...अन् स्वातंत्र्यदिनी पाटोळ ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण थांबली; जलजीवन मिशनद्वारे थेट नळजोडणी

मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 1 ऑगस्टला  41 लाख 77 हजार 397 नागरिक वस्त्या आणि चाळींमधील प्रतिबंधित क्षेत्रात राहात होते. तर 8 लाख 98 हजार 418 नागरिक सील केलेल्या इमारतीत राहत होते. अशा प्रकारे 50 लाख 75 हजार 815 नागरीकांच्या नियमित वावरावर निर्बंध होते. मात्र, आता 15 ऑगस्टच्या नोंदीनुसार ही संख्या 48 लाख 62 हजार 309 पर्यंत खाली आहे. त्यात 7 लाख 50 हजार 461 नागरिक सिल केलेल्या इमारतीत राहात आहेत. अशा एकूण 48 लाख 13 हजार 506 नागरीकांच्या दैनंदिन वावरावर मर्यादा आहेत.

सावधान! कोरोनानंतर मुंबईवर आणखी एक संकट घोंघावतय

शनिवारच्या नोंदीनुसार मुंबईतील कोव्हिड संक्रमणाचा दर 0.84 टक्‍क्‍यांवर आला आहे. तर सर्वात कमी दर एल प्रभाग कुर्ला आणि एम पूर्व देवनार, गोवंडी 0.56 टक्के आहे. डी प्रभाग ग्रॅन्टरोड, मलबार हिल येथे रुग्णवाढीचा दर 1.42 टक्के असून तो शहरातील सर्वाधिक दर आहे. त्या खालोखाल आर मध्य बोरीवली येथे 1.29 टक्के आहे.

पालघर जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली, धामणी धरण तुडूंब

सील इमारतीतील नागरिक
लालबाग परळ एफ दक्षिण - 1 लाख 49 हजार 604
गोरेगाव पी दक्षिण - 1 लाख 81 हजार 237

हरित लवादाचा बड्या कंपन्यांना जबरजस्त दणका; या कारणांमुळे ठोठावला कोटींचा दंड

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक
मालाड पी उत्तर - 6 लाख 70 हजार 703
अंधेरी जोगेश्‍वरी पूर्व के पूर्व - 5 लाख 35 हजार 030 

----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid infection is under control in mumbai, many people came out of contenment zones