Crime News : कल्याणमध्ये महिलेवर लोखंडी सळईने हल्ला; वाढत्या गुन्हेगारीमुळे भितीचे वातावरण

वाढत्या गुन्हेगारीमुळे लहान मुलांचे पालक, ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
crime increasing in Kalyan theft attack robbery beating case mumbai police
crime increasing in Kalyan theft attack robbery beating case mumbai policeesakal

डोंबिवली - कल्याण शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरी, लुटमार, मारहाण, हल्ल्याचा प्रयत्न या घटना वाढल्या आहेत. या वाढत्या गुन्हेगारीमुळे लहान मुलांचे पालक, ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

crime increasing in Kalyan theft attack robbery beating case mumbai police
Mumbai Crime : आईचा मृत्यू नैसर्गिक; लालबाग हत्या प्रकरण आरोपी रिंपलचा दावा

शुक्रवारी सकाळी कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तिने एका महिलेवर लोखंडी सळईने हल्ला करुन त्यांना जखमी केले. तर दुसऱ्या एका घटनेत कल्याण पूर्व भागात तिसगाव भागात मेट्रो माॅल समोरील रस्त्यावर एका ओला कार चालकाला मारहाण करुन दोन जणांनी त्याच्या जवळील आठ हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेली आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालणे हे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

कल्याण पश्चिमेतील अनुष्का पेट्रोल पंपाच्या पाठीमागे निला पनिकर (वय 39) राहतात. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास त्या साॅलिटेअर सभागृह येथून रस्त्याने पायी चालत जात होत्या. रस्ता ओलांडत असताना अचानक एक अनोळखी व्यक्ति नीला यांच्या दिशेने आली.

त्याने हातामधील लोखंडी वस्तूने नीला यांच्या पायावर जोरदार फटके मारुन त्यांना जखमी केले. नीला यांनी ओरडा करताच तो इसम पळून गेला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात नीला यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या एका घटनेत डोंबिवलीत राहणारे ओला कार चालक इरफान शेख (वय 28) शुक्रवारी रात्री अडीच वाजता कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक येथून आपल्या भावाला घेऊन डोंबिवलीत घरी चालले होते. यावेळी रेल्वे स्थानका जवळ एक इसम दादागिरी करुन इरफान यांच्या कारमध्ये बसून दादागिरी करू लागला.

crime increasing in Kalyan theft attack robbery beating case mumbai police
Nagpur crime news : महिलेवर चाकू हल्ला ; चौघांना अटक

त्याच्याकडे दुर्लक्ष करुन इरफान कार डोंबिवलीच्या दिशेने चालवू लागले. यावेळी मोटारीत जबरदस्तीने बसलेल्या इसमाने मोटारीचा ब्रेक ओढून गाडी बंद करण्याचा प्रयत्न केला. गाडीतील पक्कड इरफान यांच्या चेहऱ्यावर फेकली.

तसेच त्या इसमाने आपल्या आणखी एका मित्राला मेट्रो माॅल बाहेरील रस्त्यावर बोलावून तेथे तो इसम आल्यावर दोघांनी मिळून चालक इरफानला बेदम मारहाण केली. त्याच्या जवळील प्रवासी शुल्काची व इतर आठ हजार रुपयांची रक्कम लुटून पलायन केले. कल्यााण पश्चिम रेल्वे स्थानक भागात रात्रीच्या वेळेत लुटमारीचे प्रकार वाढल्याने प्रवासी, पादचारी हैराण आहेत..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com