Mumbai News : दादरमध्ये ठाकरे- शिंदे गटात फेसबुक पोस्टवरून वाद; पोलिसांकडे तक्रार

दादरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे- शिंदे गटात फेसबुक पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने दादर पोलिसांत तक्रार दिली आहे.
Crime
Crimesakal

मुंबई - दादरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे- शिंदे गटात फेसबुक पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने दादर पोलिसांत तक्रार दिली आहे. ठाकरे गटाचे उपशाखाप्रमुख संदीप पाटील यांनी फेसबुकवर शिंदे गटावर टीकात्मक एक पोस्ट शेअर केली होती.

या पोस्टवरून शिंदे गटाच्या विभाग संघटिका प्रिया सरवणकर-गुरव यांनी संदीप पाटलांना घरी घुसून मारण्याची धमकी दिली. त्यांनतर पाटील यांच्याकडून दादर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे प्रिया सरवणकर-गुरव या दादरचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या आहेत.

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज शिंदे गटाकडून करण्यात आला होता. मात्र हा अर्ज मागे घेण्यात आला. या संदर्भात प्रिया सरवणकर – गुरव यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यावर पाटील यांनी ‘उशीराने आलेले शहाणपण’ अशी टिप्पणी केली. त्यानंतर मेसेजद्वारे प्रिया सरवणकर-गुरव यांनी संदीप पाटील यांना धमकावले.

अखेर पाटील यांनी धमकी दिल्याची तक्रार पाटील दादर पोलिसांकडे दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप भागडीकर यांना लेखी तक्रार अर्ज देण्यात आला आहे. याबाबत प्राथमिक चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे दादर पोलिसांनी माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com